Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आई झाल्यानंतर सानिया मिर्झाचे जोरदार पुनरागमन, दुहेरीचे अजिंक्यपद

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंतर दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले. 

आई झाल्यानंतर सानिया मिर्झाचे जोरदार पुनरागमन, दुहेरीचे अजिंक्यपद

मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंतर दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले. तिने दुहेरीचे अजिंक्यपद मिळवत जोरदार पुनरागमन केले आहे. सानियाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या (WTA Hobart International Tennis) महिला दुहेरी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले आहे. सानियाचे हे दुहेरीमधले ४२ वे विजेतेपद ठरले. 

fallbacks

सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने धुव्वा उडवला. अवघ्या १ तास २१ मिनिटांत सानिया-नादीया जोडीने हा सामना सहज जिंकला.

सानियाच्या नावावर २०१६ चे ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरी आणि २००९चे मिश्र-दुहेरी स्पर्धेचे जेतेपदही नावावर केले आहे. सानियाने २०१७ मध्ये चीन ओपन स्पर्धेत तिने शेवटचा सामना खेळला होता.

Read More