Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मी बाळाला दूध पाजून झाल्यानंतर...', शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा स्पष्टच बोलली, 'तीन वेळा प्रेग्नंट...'

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) एक आई म्हणून समोर आलेल्या आव्हानांबद्दल परखडपणे भाष्य केलं आहे. तसंच मुलगा इझान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) याला पूर्वाश्रमीचा पती शोएब मलिकसोबत कशाप्रकारे सांभाळत आहे याबद्दलही सांगितलं.   

'मी बाळाला दूध पाजून झाल्यानंतर...', शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा स्पष्टच बोलली, 'तीन वेळा प्रेग्नंट...'

भारतातील माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) आपला आई होण्याचा प्रवास नेमका कसा होता याबद्दल सांगितलं आहे. तसंच मुलगा इझान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) याला पूर्वाश्रमीचा पती शोएब मलिकसोबत कशाप्रकारे सांभाळत आहे याबद्दलही सांगितलं. युट्यूबवरील एका मुलाखतीदरम्यान सानिया मिर्झाने अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. ज्यामध्ये समाजाच्या असणाऱ्या अपेक्षांशी जुवळून घेताना होणारा संघर्ष आणि मुलांचा सांभाळ करताना महिलांसमोर असणारी आव्हानं यांचा समावेश होता. सानिया म्हणाली की जेव्हा दोन्ही पालकांच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला जातो तेव्हा ते कधीही 50-50 टक्के नसते. याला दुजोरा देण्यासाठी तिने काही किस्सेही सांगितले. 

"दोन पालकांमध्ये कधीच 50-50 टक्के नसतं. मी 2.5 ते 3 महिने बाळाला दूध पाजलं. माझ्यासाठी गरोदपणातील हा सर्वात कठीण काळ होता. माझं असं होतं की, मी अजून तीन वेळा गर्भवती होईन, पण हे स्तनपान करणं मला जमेल की नाही माहिती नाही. माझ्यासाठी हा फक्त शारिरीक भाग नव्हता. माझी भावनिक आणि मानसिक पातळी अक्षरश: खालावत होती. तुम्ही काम करणाऱ्या महिला असता तेव्हा अजून थकवणारं असतं. ते त्यावर इतके अवलंबून आहेत, त्यात वेळेची वचनबद्धता आहे, पुरेशी झोप मिळत नाही आणि तुम्ही सर्व गोष्टी स्तनपानाच्या दृष्टीकोनातून ठरवत आहात. मी जे आवश्यक होतं ते सर्व केलं," असं सानिया मिर्झाने सांगितलं.  

मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदा त्याला सोडून प्रवास केला तेव्हा मनात काहीतरी अपराध करत असल्याची भावना होती याबद्दलही तिने सांगितलं. नोकरी करणाऱ्या मातांचा उल्लेख करत सानिया म्हणाली की तिला तिच्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या सहा आठवड्यांनी एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जावं लागलं होतं. त्या प्रवासादरम्यान नेमकं मनात काय सुरु होतं हे सानियाने सांगितलं.

"इझानला मी पहिल्यांदा घरी सोडून गेले तेव्हा तो फक्त सहा आठवड्यांचा होता. तो फार कठीण क्षण होता. मी केलेला सर्वात कठीण विमान प्रवास होती. मला दिल्लीला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. मी म्हटलं होतं मी जाणार नाही. मी त्यावेळी मुद्दामून नाटकं करत होते. लोक नेहमीच असं करत असतात. पण मुलं अगदी ठीक असतात. आपल्या मनातच अपराध्याची भावना असल्याने आपण स्वत:ला दोष देत राहतो," असं सानिया मिर्झाने सांगितलं. 

Read More