Sanju Samson : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) हा आगामी आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ सोडू इच्छितो अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्समधून 7 ऑगस्टला माहिती समोर आली की संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीला विनंती केली की त्यांनी एकतर त्याला दुसऱ्या संघात ट्रेड करावं किंवा मग संघातून ऑक्शनपूर्वी रिलीज करावं. संजू हा फ्रेंचायझीच्या मॅनेजमेंटबाबत खुश नाही अशी माहिती मिळतेय. या चर्चे दरम्यान भारताचा माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने (Aakash Chopra) एक मोठं वक्तव्य केलंय. आकाश चोपडाने या सगळ्याचा संबंध हा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सोबत जोडला आहे. आकाशचं म्हणणं आहे की वैभवच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे संजू सॅमसन आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी फ्रेंचायझीमधून निघू इच्छितो.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना प्रश्न उपस्थित केला की, सॅमसनला राजस्थानचा संघ का सोडायचाय? खासकरून त्याची मागच्या सीजनमधील भूमिका पाहून. चोपडाने पुढे म्हटलं की, 'संजू सॅमसन संघ का सोडू इच्छितो? हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण मेगा ऑक्शनपूर्वी जे रिटेन्शन झालं होतं त्यावेळी त्यांनी जोश बटलरला सोडलं होतं. मला वाटतं की त्यांनी जोश बटलरला जाऊ यासाठी दिलं कारण तोपर्यंत यशस्वी आला होता. संजू स्वतः ओपनिंग करण्यासाठी आला होता. संजू आणि राजस्थान रॉयल्सचं नातं खूप घट्ट आहे'.
चोपडाचं म्हणणं आहे की, युवा सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या येण्याने संघाच्या गतिशीलतेला बदललं आहे. चोपडाने पुढे सांगितले की, मला वाटलं होतं की ज्या खेळाडूंना राजस्थानने रिटेन आणि रिलिज केलं होतं. त्यात संजूचं खूप मोठं इनपूट राहिलं होतं. पण आता असं वाटतं की कदाचित असं झालं नसावं. वैभव सूर्यवंशी आला आहे त्यामुळे दोन सलामी फलंदाज आधीपासूनच तयार आहे. ध्रुव जुरेलने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, इत्यादी कारणांमुळे कदाचित संजूला संघाबाहेर जायचे आहे. जर तो असा विचार करत असेल तर ते शक्य आहे. हा फक्त माझा अंदाज आहेत. संजूच्या आणि राजस्थानच्या मनात काय चालले आहे हे मला माहित नाही.
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघ सोडू इच्छितो ही बातमी समोर आल्यावर 5 वेळा आयपीएल विजेता राहिलेला चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी स्वारस्य दाखवल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार IPL 2025 नंतर संजू सॅमसनने चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगची सुद्धा भेट घेतली.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडू इच्छितो का?
होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसनने 7 ऑगस्ट 2025 रोजी राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीला विनंती केली आहे की त्याला एकतर दुसऱ्या संघात ट्रेड करावं किंवा आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी रिलीज करावं.
आकाश चोप्राने संजू सॅमसनच्या निर्णयाबाबत काय म्हटलं आहे?
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, वैभव सूर्यवंशीच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे आणि राजस्थान रॉयल्सच्या सलामी फलंदाजीच्या रणनीतीत बदल झाल्याने संजू सॅमसन संघ सोडू इच्छित असावा. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेलसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संजूच्या भूमिकेवर परिणाम झाला असावा, असा त्यांचा अंदाज आहे.
संजू सॅमसनच्या ट्रेडबाबत अंतिम निर्णय कधी होऊ शकतो?
याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी किंवा ट्रेड विंडोदरम्यान याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.