Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 दरम्यान सारा तेंडुलकर बनली मुंबई संघाची मालकीण, सचिनच्या लेकीचं क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल

Sara Tendulkar :  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करताना दिसणारी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिने एका क्रिकेट लीगमधील टीम खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सारा तेंडुलकर ही चर्चेत आलीये. 

IPL 2025 दरम्यान सारा तेंडुलकर बनली मुंबई संघाची मालकीण, सचिनच्या लेकीचं क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल

Sara Tendulkar : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या टी 20 स्पर्धेचा 18 वा सीजन 22 मार्च पासून सुरु झालेला आहे. 10 संघांनी यात सहभाग घेतलेला असून यात आतापर्यंत 74 पैकी 13 सामने खेळून झालेले आहेत. दररोज प्रेक्षकांना आयपीएलचे रोमांचक सामने पाहायला मिळतात. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करताना दिसणारी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिने एका क्रिकेट लीगमधील टीम खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सारा तेंडुलकर ही चर्चेत आलीये. 

ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये सारा तेंडुलकरने एक टीम खरेदी केली आहे. मुंबईला रिप्रेझेंट करणारी मुंबई ग्रिजलीज या संघाला तिने खरेदी केलं आहे. ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग ही एक गेमिंग लीग असून 10 संघांचा यात सहभाग आहे, आता सारा तेंडुलकर ही यातील मुंबई संघाची अधिकृत मालकीण बनली आहे. सारा तेंडुलकर ही क्रिकेटची खूप मोठी फॅन आहे. साराचे वडील मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हे स्वतः भारतीय संघातील माजी दिग्गज क्रिकेटर असून त्यांच्या नावावर मोठे रेकॉर्डस् आहेत. सध्या सचिन तेंडुलकर हा आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असून साराचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकर देखील मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्यामुळे सारा ही आयपीएल दरम्यान मुंबई इंडियन्सला खुलून सपोर्ट करताना दिसते. 

हेही वाचा : काही झाले खासदार तर काहींचं करिअर झालं उध्वस्त, World Cup 2011 जिंकणारे टीम इंडियातील खेळाडू सध्या काय करतात?

ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी लीग असून या लीगच्या पहिल्या सीजन पासून याला प्रचंड मागणी आहे.  या लीगने आतापर्यंत 300 दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स मिळवले आहेत. पहिल्या हंगामातील 2 लाख लोकांनी नोंदणी केली होती. GEPLने क्रिकेट ईस्पोर्ट्समध्ये अग्रणीचे स्थान पटकावले आहे.

सारा तेंडुलकर ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा सारा खूप लोकप्रिय असून ती अनेक ब्रँड सोबत कोलॅबरेशन करत असते. सारा तेंडुलकर हिने विज्ञान क्षेत्रात मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे. सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डिरिस्टर म्हणून सारा तेंडुलकर काम करते. ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीगच्या मुंबई संघाची मालकीण झाल्यावर सारा तेंडुलकर म्हणाली की, 'क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. ई-स्पोर्ट्समधील रोमांचक प्रवासासाठी मी उत्सुक आहे. जीईपीएलमध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्या सारखे आहे. यामधून माझी खेळाबद्दलची आवड आणि शहरावरील प्रेम यातून सिद्ध होईल. 

Read More