Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral

Shubman Gill teased by Ravindra Jadeja: शुभमन गिलचं नाव सचिन आणि अंजली तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच नाव  शुभमनसोबत अनेक काळापासून जोडलं जात आहे. आता त्यावरूनच रवींद्र जडेजा शुभमन गिलची मज्जा घेताना दिसला.     

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral

 sara tendulkar mother anjali video: इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेत एकीकडे शुभमन गिलची बॅट जणू आग ओकत असताना,  दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण? सीनमध्ये होते सारा तेंडुलकरची आई अंजली,  तिच्या जवळ बसलेला गिल, आणि त्यावरून चिडवायला जडेजा. यामुळे   इंग्लंडमध्ये कसोटी मालिका रंगत असताना, भारताचा तरुण कर्णधार शुभमन गिल केवळ आपल्या फलंदाजी‑कर्णधारपदामुळेच नाही, तर एका व्हायरल व्हिडीओमुळेही चर्चेत आहे.

युवराजच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती

लीड्स‑एजबॅस्टन कसोटीनंतर टीम इंडिया युवराज सिंगने आयोजित केलेल्या चॅरिटी ईव्हेंटला हजर होती. कार्यक्रमात सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासह आले. गिल आणि सारा दोघेही एका छताखाली दिसताच, नेटकऱ्यांनी लगेच जुनी ‘गॉसिप फाईल’ उघडली. 

जडेजाने घेतली मज्जा 

व्हायरल व्हिडीओत गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा टेबलावर बसलेले असताना अचानक कॅमेरा अंजली तेंडुलकरवर स्थिरावतो. गर्दीत टाळ्यांचा गदारोळ सुरू होताच जडेजा हळूच गिलकडे वळतो आणि मिश्किल पद्धतीनं त्याला छेडतो. राहुल खूप हसतो, तर ऋषभ पंत तर जडेजाच्या पाठीत थाप देत हसायला लागतो. 

 

‘गिल‑सारा’ क्लिपही चर्चेत

याच कार्यक्रमातील दुसऱ्या व्हिडीओत गिल प्रवेश करताच सारा त्याच्याकडे पाहते, पण गिल थेट पुढे निघून जातो. दुसऱ्या क्लिपमध्ये सारा टीम इंडियाचा ग्रुप व्हिडीओ शूट करताना दिसते. चाहत्यांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी आहे. पण अजूनही ते दोघे 'चांगले मित्र' आहेत असेच सांगितले जात आहे. त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा मात्र अद्याप मिळालेला नाही. 

 मैदानावर गिलचा ‘सुसाट’ फॉर्म

लीड्स व एजबॅस्टन कसोटीत गिलने 2 शतके + 1 द्विशतक ठोकत कर्णधार म्हणून तोडफोड कामगिरी केली. लॉर्ड्स कसोटीत विजय मिळाल्यास भारत 2-1 ने आघाडी घेऊ शकतो. एकंदरितच कसोटी मालिका रंगतदार सुरू असतानाच, फिल्ड आणि ऑफ‑फिल्ड दोन्ही आघाड्यांवर शुभमन गिलची धमाल पाहायला मिळते आहे. जडेजाच्या मज्जेशीर टोमण्यांमुळे टीमच्या ड्रेसिंग रूममधली धमाल‑मस्तीही चाहत्यांपर्यंत पोहोचली. 

Read More