Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दिवसाची चांगली सुरुवात करुन दिल्यामुळे Sara Tendulkar कडून खास व्यक्तीचे आभार, फोटो व्हायरल

सारा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावरती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.

दिवसाची चांगली सुरुवात करुन दिल्यामुळे Sara Tendulkar कडून खास व्यक्तीचे आभार, फोटो व्हायरल

मुंबई : टीम इंडियामधील सगळ्याच खेळाडूंच्या आयुष्याबाबात जाणून घेण्यासाठी लोक फारच उत्सुक असतात. एवढंच काय तर या खेळूंच्या घरची किंवा जवळची व्यक्ती देखील काय करते कुठे जाते? हे लोक पाहातात आणि सोशल मीडियावर त्यांना फॉलो देखील करतात. सध्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची सर्वत्र चर्चा आहे आणि सारा सोशल मीडियावर ट्रेंडिगवरती आहे.

सारा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावरती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. सध्या साराने तिच्या जिममधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्याची सर्वत्र चर्चा आहे. तसेच तिने एक फोटो आपल्या स्टोरीवरती देखील ठेवला आहे. ज्यामध्ये तिने खास व्यक्तीचे आभार मानले आहे.

पहिल्या फोटोमध्ये सारा जिममध्ये आहे. जेथे तिने बसुन फोटो काढला आहे. तर तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ज्युस पिताना फोटो टाकला आहे आणि आपले प्रशिक्षण गोपाल यांचेही आभार मानले आहे.

परंतु तसे पाहाता साराच्या हातातील ज्युसचा ग्लासमध्ये हिरव्या रंगाचा ज्युस आहे, जो कदाचित कारळं, पालक किंवा ऍवोकार्डोचा असू शकतो. जो साराला आवडत नसावा, परंतु तिला तिच्या कोचचं म्हणणं नाकारता न येत असल्यामुळे, तिला तो ज्युस प्यावा लागतोय, ज्यामुळे तिने तिच्या दिवसाची सुरुवात असा पद्धतीने झाल्यामुळे कोचचे आभार मानले असावे.

fallbacks

अलीकडेच सारा तेंडुलकरने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतल्यानंतर सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे देखील ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

सारा तेंडुलकरनेही काही काळापूर्वी जाहिरात चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. त्याने एका कपड्याच्या ब्रँडसाठी जाहिरात शूट केली. या जाहिरातीत सारासोबत त्याचे काही मित्रही दिसले.

Read More