Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा Video

Duleep Trophy 2024 : युवा फलंदाज सरफराज खान याने आपल्या भावाच्या विकेटच्या बदला व्याजासकट घेतला आहे. त्याचीच चर्चा होताना दिसतेय.  

सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा Video

India A vs India B : दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात सामना खेळवला जात आहे. इंडिया बी संघाने 76 धावांनी इंडिया ए संघाचा पराभव केलाय. या सामन्यातील प्रदर्शनवरून काही युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जातील. टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी दुलीप ट्रॉफी म्हणजे युवा खेळाडूंसाठी खरी कसोटी असेल. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात युवा खेळाडू मुशीर खान याने अफलातून कामगिरी करत क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात 'रिवेन्ज स्टोरी' दिसून आली. सरफराज खान याने आपल्या भावाचा बदला व्याजासह पूर्ण केला. 

मुशीर खान याने पहिल्या डावात 181 धावांची बेधडक इनिंग खेळली. पण दुसऱ्या डावात मुशीरला भोपळा फोडता आला नाही. मुशीरने जर दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक जरी ठोकलं असतं तर दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात मुशीर खानची नोंद झाली असती. पण आकाश दीपच्या भेदक बॉलसमोर मुशीरला विकेट गमवावी लागली. ध्रुव जुरैलने अप्रतिम कॅच घेतला. मुशीरला दुसऱ्या डावात एकही धाव करता आल्याने मोठा भाऊ सरफराज खान याला राग आला अन् मुशीरला बाद करणाऱ्या आकाश दीपला सरफराजने 5 खणखणीत फोर मारले. 

मुशीरची विकेट

सरफराज जणू टी-ट्वेंटी खेळतोय, अशी फलंदाजी सरफराजने आकाश दीपविरुद्ध केली. सरफराजने दुसऱ्या डावात 36 बॉलमध्ये 46 धावा केला, यामध्ये 7 फोर अन् एका सिक्सचा देखील समावेश होता. आकाश दीपविरुद्ध सरफराजने दाखवलेलं अँग्रेशन चर्चेचा विषय ठरला आहे. 

दरम्यान, इंडिया बी संघाने पहिल्या डावात 321 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंडिया ए संघाला फक्त 231 धावा उभारल्या आल्या. त्यानंतर आता दुसऱ्या डावात इंडिया बी संघाने दुसऱ्या डावात 184 धावा केल्या. त्यानंतर इंडिया ए संघासमोर मोठं आव्हान होतं. मात्र, इंडिया ए संघ 198 धावाच करू शकला. त्यामुळे इंडिया बी संघाने 78 धावांनी विजय मिळवला आहे. 

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.

इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.

Read More