Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक अन् IPL ला टक्कर, BCCI सोबत पंगा घेत 'हा' देश घेऊन येतोय मोठी लीग

New T20 league: क्रिकेट विश्वात एक नवीन लीगची सुरुवात होणार आहे. ही टी-20 लीग अगदी नव्या पद्धतीनं आणि नव्या फॉरमॅटनं सुरू होणार असल्याची माहिती आहे.  

434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक अन् IPL ला टक्कर, BCCI सोबत पंगा घेत 'हा' देश घेऊन येतोय मोठी लीग

4300 cr T20 league: सध्या भारताने सुरु केलेली आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. बीसीसीआयच्या अंडर दरवर्षी भारतात खेळवली जाणारी ही लीग आता इतर मोठ्या लीगशीही स्पर्धा करू लागली आहे. अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीग (NFL) नंतरची ही दुसरी सर्वात महागडी लीग आहे. ज्याची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 90 हजार कोटी रुपये आहे. पण आता आपल्या देशातील लीगला आव्हान देण्यासाठी एक देश सज्ज होत आहे. सौदी अरेबिया नवीन लीग तयार करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास तयार आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला सौदी अरेबिया या लीगसाठी 4300 कोटी रुपये (434,742,00,000) खर्च करू शकतो. असे झाल्यास सौदी अरेबिया थेट जगातील सर्वात मजबूत बोर्ड समजल्या जाणाऱ्या बीसीसीआयशी सरळ पंगा घेईल.

कोणत्या तज्ज्ञांची असणार जबाबदारी

ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबियाने ही लीग बनवण्याची जबाबदारी क्रिकेट तज्ञ नील मॅक्सवेलला दिली आहे. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा आहे. मॅक्सवेल हा खेळाडू  या मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व करत आहे. या लीगला बनवण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी  सौदी अरेबिया SRJ स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटची मदत घेईल. याचे  नेतृत्व डॅनी टाऊनसेंड करत आहे. अहवालानुसार, हा समूह 500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4300 कोटी रुपये) खर्च करू शकतो. असे झाले तर फुटबॉल, गोल्फ आणि कार रेसिंगनंतर आता क्रिकेटमध्येही सौदी अरेबियाचे मोठे नाव होईल.

हे ही वाचा: WPL Final Prize Money: चॅम्पियन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सवर पैशांचा पडला पाऊस, दिल्लीही झाली मालामाल

 

कशी असू शकते ही लीग?

एका अहवालानुसार, सौदी अरेबियाच्या नव्या लीगमध्ये 8 संघांचा समावेश करण्यात येणार आहे. या लीगची खास गोष्ट म्हणजे टेनिसच्या ग्रँडस्लॅमप्रमाणेच सर्व संघ वर्षभर वेगवेगळ्या देशांमध्ये खेळत राहतील. यानंतर सौदी अरेबियात ग्रँड फायनलचे आयोजन करण्यात येणार आहे. नील मॅक्सवेल जवळपास वर्षभरापासून या लीगसाठी प्लॅनिंग करत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने त्यांना या मोठ्या लीगचा प्रोजेक्ट  साध्य करायचा आहे. यासाठी आयसीसीच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा: 'हा' आहे एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू

 

या लीगचा उद्देश काय?

या लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी  क्रिकेटला जास्त मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मोठ्या क्रिकेट देशांव्यतिरिक्त इतर देशांनाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचेही उद्देश आज. यासाठी प्रयत्न केले जातील. या लीगद्वारे कमाईचा नवा स्रोत उघडेल, ज्यामुळे पैशासाठी संघर्ष करणाऱ्या संघांना मदत होईल. या लीगची आयपीएल आणि बिग बॅश लीगशी टक्कर होणार नाही, अशा गोष्टी सध्या समोर आल्या आहेत.

Read More