पुणे : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही मॅचमध्ये शतक केल्यानंतर विराट कोहलीनं शनिवारी पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे करवा चौथचे फोटो शेअर केले. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं करवा चौथ होतं. मॅच संपल्यानंतर लगेचच विराटनं सोशल नेटवर्किंगवर हे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये विराटनं काळा कुर्ता घातलाय. तर अनुष्कानं पिवळ्या रंगाच्या कडा असलेली साडी नेसली आहे. या दोघांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो पोस्ट केले आहेत.
माझं आयुष्य... माझं जग.... असं कॅप्शन देत विराट कोहलीनं अनुष्का शर्मासोबतचा करवा चौथचा फोटो शेअर केला आहे.
My life. My universe. Karvachauth @AnushkaSharma pic.twitter.com/a2v18dh8rH
— Virat Kohli (@imVkohli) October 27, 2018
माझा चंद्र... माझा सूर्य... माझा तारा... माझं सगळं काही... असं कॅप्शन अनुष्का शर्मानं फोटोंना दिलं आहे.
My moon , my sun , my star , my everything
— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 27, 2018
Happy karva chauth to all pic.twitter.com/7saMNS6jdy