Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'ड्रग्स घेतलंय का?', पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर भडकले भारतीय फॅन्स

Shahid Afridi : मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भारताविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केलं

'ड्रग्स घेतलंय का?', पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर भडकले भारतीय फॅन्स

Shahid Afridi : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा बऱ्याचदा भारताबद्दल अवमानजनक वक्तव्य करताना दिसतो. शाहिद आफ्रिदीच एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं यात तो म्हणाला की, विकासाच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा 10 वर्ष मागे आहे आणि तो पाकिस्तान सोबत स्पर्धा करण्याचं स्वप्न पाहतोय. शाहिद आफ्रिदीने असं देखील म्हटले की, भारताला पाकिस्तानचा शत्रू म्हणणं देखील त्यांच्या देशाचा अपमान करण्यासारखे आहे. शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) भारताबद्दल असं वक्तव्य करणं महागात पडलं असून त्याला सोशल मीडियावर भारतीय फॅन्स ट्रोल करत आहेत. 

शाहिद आफ्रिदीचं अवमानजनक वक्तव्य : 

मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भारताबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं. तो म्हणाला की, 'भारत विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा १० वर्ष मागे आहे. ते पाकिस्तानची बरोबरी करण्याचं स्वप्न नक्कीच पाहतात पण ते कधीच पाकिस्तानची बरोबरी करू शकत नाही. भारताला पाकिस्तानचा शत्रू म्हणणं देखील आपल्या देशाचा अपमान आहे'. 

हेही वाचा : टीम इंडियाच्या सराव सत्रातच मोठा झटका! इंग्लंडमध्ये पहिल्याच दिवशी सरावादरम्यान 'हा' स्टार खेळाडू जखमी

ड्रग्स घेतलंय का? : 

सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट फॅन्सनी शाहिद आफ्रिदीला चांगलंच धारेवर धरून ट्रोल केलं. एका यूजरने म्हटले की, 'शाहिद आफ्रिदी अजूनही ड्रग्सवर जिवंत आहे'. अजून एका यूजरने म्हटले, 'कोणता नशा करतात ही लोकं?'. त्यानंतर इतर यूजरनी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान उद्योग आणि कामगिरीची तुलना करणारे मीम्स आणि व्हिडिओ शेअर केले जेणेकरून शाहिद आफ्रिदीचे टिप्पण्या दिशाभूल करणारे आणि खोटे असल्याचे दाखवता येईल.

यापूर्वी देखील शाहिद आफ्रिदीने भारताबाबत अनेकदा अपमानास्पद वक्तव्य केली आहेत. काही 22 एप्रिल रोजी पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी पहलगाम येथे फिरायला आलेल्या २६ पर्यटकांना गोळ्या घालून ठार केलं होतं. यावर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, 'भारतात कोणी फटाका जरी फोडला तरी बोट पाकिस्तानवर उचललं जातं. काश्मीरमध्ये भारताकडे 8,00,000 सैनिकांची फौज आहे आणि तरीही हे घडले. याचा अर्थ असा की जर तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नसाल तर तुम्ही अक्षम आणि निरुपयोगी आहात'.

Read More