Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मृतदेहाशेजारी रक्ताने भरलेला...', शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा, 'अनेक पॉवरफूल...'

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर घटनास्थळी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दावा केला आहे की, तिथे एका आक्षेपार्ह गोष्ट आढळली होती जी वरिष्ठांच्या आदेशानंतर तेथून हटवण्यात आली.   

'मृतदेहाशेजारी रक्ताने भरलेला...', शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा, 'अनेक पॉवरफूल...'

Shane Warne Death: क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांचं जेव्हा कधी नाव घेतलं जातं तेव्हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. एप्रिल 2022 मध्ये शेन वॉर्नचं निधन झालं. थायलंडमध्ये ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराचा झटका शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण सांगितलं जात असलं तरी, नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, शेन वॉर्नच्या मृत्यूमागे एक भारतीय औषध असण्याची शक्यता आहे. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला कामाग्राची एक बाटली सापडली. हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे नपुसंकत्व असलेल्या लोकांकडून वापरलं जातं. या औषधात व्हायग्रासारखेच घटक आहेत परंतु हृदयरोग असलेल्या लोकांनी ते वापरू नये असं म्हटलं जातं.

एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, काही वरिष्ठांनी शेन वॉर्नसारख्या मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत अशी माहिती माध्यमात येऊ नये यासाठी ते औषध तेथून हटवण्यास सांगितलं. त्याने म्हटलं आहे की, वरिष्ठांनी त्या बाटलीला घटनास्थळावरुन गायब करण्याचा आदेश दिला.

"हे आदेश वरिष्ठांकडून येत होते आणि मला वाटतं की ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ अधिकारी देखील यात सामील होते. कारण त्यांना त्यांच्या देशातील इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा असा शेवट व्हावा असं वाटत नव्हतं. त्यामुळेच अधिकृत अहवाल बाहेर तेव्हा त्यात फक्त ह्रदयविकाराचा झटका आल्याचा उल्लेख होता. याशिवाय इतर कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. कामाग्राची पुष्टी करण्यासाठी कोणीही समोर येणार नाही कारण हा एक संवेदनशील विषय आहे. या सर्वामागे अनेक शक्तिशाली अदृश्य हात होते," असा खळबळजनक खुलासा अधिकाऱ्याने केला आहे. 

"ती एक बाटली होती. पण त्याने ते किती प्रमाणात घेतलं होतं याची कल्पना नाही. परंतु त्याने किती घेतले हे आम्हाला माहित नाही. घटनास्थळी उलट्या आणि रक्तही होतं. एका डब्यात ते होतं. परंतु आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कामग्रा साफ केला," अशी माहिती त्याने दिली. 

वॉर्नच्या मृत्यूनंतर सुरत थानी रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदनात नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात कोणत्याही प्रकारच्या कटाची शक्यता नाकारण्यात आली.

Read More