Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पंजाब किंग्सच्या स्टार खेळाडूचे 'ते' शब्द खरे ठरले; MI च्या पराभवानंतर Video व्हायरल

PBKS VS MI IPL 2025 : मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने पूर्ण केलं. यासह त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

पंजाब किंग्सच्या स्टार खेळाडूचे 'ते' शब्द खरे ठरले; MI च्या पराभवानंतर Video व्हायरल

PBKS VS MI IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा 69 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने पूर्ण केलं. यासह त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने शेवटच्या लीग स्टेज सामन्यात टेबल टॉप करण्याची सुवर्ण संधी पराभूत होऊन गमावली, ज्यामुळे त्यांना आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. पंजाब किंग्सने आयपीएल 2025 च्या टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केल्यावर पंजाब किंग्सचा स्टार क्रिकेटर शशांक सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शशांकने स्पर्धेच्या सुरुवातीलाच वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं आहे. 

काय म्हणाला होता शशांक सिंह? 

आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज शशांक सिंह याची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत शशांकला प्रश्न विचारण्यात आला की, 'आयपीएल 2025  मध्ये कोणते संघ टॉप 4 मध्ये असतील?' यावर त्याने उत्तर देताना 'पंजाब किंग्स' चं नाव घेतलं. तो म्हणाला होता की, 'पंजाब किंग्स टॉप 2 मध्ये पोहोचेल'. एवढंच नाही तर शशांक मुलाखतकाराला असं सुद्धा म्हणाला होता की, पंजाब खरोखरच टॉप 2 मध्ये असेल आणि 14 व्या सामन्यानंतर मी तुम्हाला मेसेज करेन की सर माझी ती मुलाखत पुन्हा चालवा'. शशांक सिंहचा हा आत्मविश्वास खरा ठरल्यावर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

पाहा व्हिडीओ : 

पंजाब किंग्सने मुंबईचा तोंडचा घास हिरावला : 

आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. 

 पंजाब किंग्सने 18.3 मध्ये 187 धावा करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं. यासह पंजाब किंग्सने पॉईंट्स टेंबलमध्ये गुजरातला मागे सारून पहिलं स्थान पटकावलं असून यामुळे त्यांचं प्लेऑफसाठीच टॉप २ मधील स्थान पक्कं झालं आहे. त्यामुळे पंजाबला क्वालिफायर १ सामना खेळले, यात ते पराभूत झाल्यास त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल. 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

रियान रिकलटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

पंजाब किंग्सची प्लेईंग 11 :

प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, हरप्रीत ब्रार, काईल जेमिसन, विजय कुमार वैश्यक, अर्शदीप सिंग

Read More