Viral News : सोशल मीडियावर एका चेअर लिडरने महिला कोचबद्दल धक्कादायक दावा केला आहे. या चेअर लिडरने असा आरोप केला की, तिची महिला कोच तिला वेगवेगळ्या हॉटेलमधील रुममध्ये घेऊन जाते आणि अत्याचार करते. ही धक्कादायक घटना चेअर लिडर 13 वर्षांची असताना सहन करावी लागली होती. निया असं या चेअर लिडरचं नाव असून ती 13 वर्षांची असताना चीयरलीडिंग ग्रुपमध्ये जाईंन झाली. नियाला लहानपणापासून खेळ आणि जिमनास्टिक आवडायचं. त्यामुळे आपल्याला चीयरलीडिंग टीममध्ये प्रवेश मिळाला हे कळल्यावर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. पण या आनंदावर लवकरच विरजन लागलं. तिची महिला कोच ज्यावेळी म्हणाली की, तुला मी चांगलं शिकवेल तर रोज सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत थांब. तिला आनंद झाला आणि लगेचच होकार दिला.
पण तिचा हा उत्साह आणि शिकण्याची जिद्द तिच्या आयुष्यात भयानक वादळ घेऊन आली. तिची महिला कोच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगळ्या नावाने रुम बूक करायची आणि त्या 13 वर्षीय नियावर यौन शोषण करायची.
नियाने सांगितलं की, महिला कोच सुरुवातीला प्रॅक्टिसबद्दल गप्पा मारायची पण काही महिन्यांतर तिने नियाचा शोषण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर अवान तिला म्हणाली हे सर्व सामान्य आहे. पण काही महिन्यांनी ती कपड्यांखाली स्पर्श करायला लागली. स्पर्धेसाठी बाहेर गावी गेल्यावर हॉटेलमध्ये महिला कोच तिच्यासाठी वेगळ्या नावाने रुम बूक करायची पण तिला स्वत:च्या जवळ झोपवायची. निया घाबरली होती कारण तिला ग्रुपमध्येही चांगलं स्थान मिळालं होतं. जर ही गोष्ट कोणाला कळली तर गैरसमज होईल आणि तिची अडचण वाढेल. त्यानंतर तिने सर्व काही डायरीत लिहायला सुरुवात केली. हीच डायरी 2013 मध्ये पालकांच्या हाती लागली आणि त्यांना धक्काच बसला.
निया डूरंट आज 27 वर्षांची असून तिने हे वेदनादायी कहाणी सोशल मीडियावर सांगितली आहे. 2010 मध्ये नियासोबत हा अत्याचार सुरु झाला आणि 2013 मध्ये हे सत्य समोर आलं खरं पण तिने पोलिसांनी याबद्दल काही सांगितलं नाही. त्यानंतर 2017 मध्ये ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना तिला जाणव झाली की, आपण जर आताही आवाज उठवला नाही, तर दुसऱ्या मुलींना त्या महिला कोचकडून अशाच त्रास होत राहिल. त्यामुळे तिने हिम्मत करत 2018 मध्ये पोलिसांनी तिच्यासोबत झालेल्या यौन शौषणबद्दल तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिला कोच अवनला अटक करण्यात आली. मग 2020 मध्ये अवनवर पाच यौन शोषणाच्या आरोपांची सिद्ध झाले. यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये तिला 10 वर्षांची शिक्षा झाली.