Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून शिखर धवन बाहेर

गुडघ्याच्या जखमेमुळे सलामीचा फलंदाज शिखर धवन पहिल्या टेस्टमध्ये टीम बाहेर असणार आहे. 

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून शिखर धवन बाहेर

नवी दिल्ली : भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान ५ जानेवारीपासून टेस्ट मॅच सुरू होत आहे. यामध्ये मुरली विजयसोबत के.एल.राहुल खेळाची सुरूवात करणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार गुडघ्याच्या जखमेमुळे सलामीचा फलंदाज शिखर धवन पहिल्या टेस्टमध्ये टीम बाहेर असणार आहे. 

गुडघ्याला दुखापत 

२६ डिसेंबर ला कॅप्टन विराट कोहलीच्या लग्नाच्या रिसेप्शनवरून येताना धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली. टीम मॅनेजमेंटला या सिरीजमध्ये कोणती रिस्क घ्यायची नाहीए. म्हणून केएल राहूला संधी देण्यात आली आहे. 

विराट नाराज

आपल्या जखमेकडे दुर्लक्ष केल्याने विराट चांगलाच नाराज झाला आहे. 
  
 टीम मॅनेजमेंटला मुरली विजय कडून या सामन्यात जास्त अपेक्षा आहेत. कारण २०११ मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध ८७ रन्सने जिंकलेल्या संघात तो होता. 

Read More