Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

घटस्फोटानंतर पत्नीनं मुलाला शिखर धवनपासून केलं दूर, क्रिकेटरची झाली अशी अवस्था

घटस्फोटानंतर पत्नीचा निर्णय... शिखर धवनपासून आता मुलगा गेला दूर

घटस्फोटानंतर पत्नीनं मुलाला शिखर धवनपासून केलं दूर, क्रिकेटरची झाली अशी अवस्था

मुंबई: शिखर धवन आणि त्याच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. सोशल मीडियावर शिखर धवननं याबाबत माहिती दिली. शिखर धवनच्या पत्नीने घेतलेल्या निर्णयामुळे धवनची अवस्था खूप वाईट झाली आहे.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात शिखर धवनची कामगिरी उत्तम होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्याचा फॉर्म चांगला नव्हता. टी 20 वर्ल्ड कपसाठी देखील त्याला संधी देण्यात आली नव्हती. 

आयशा मुखर्जीसोबत त्याचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. आता गब्बरने मुलासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आयशा आपल्या मुलाला घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये निघून गेली. तिच्या या निर्णयामुळे शिखरपासून त्याचा मुलगा दूर झाला.

शिखर धवननं इंस्टाग्रामवर मुलगा जोरावरसोबत झालेल्या व्हिडिओ कॉल संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये धवन आणि त्याचा मुलगा एकाच हेअरस्टाईलमध्ये दिसत आहेत. 

हा फोटो शेअर करत शिखर धवनने कॅप्शन लिहिले - "जसा बाप, तसा बेटा, मला तुझी आठवण येत आहे." शिखरचं हे कॅप्शन खूप भावुक करणारं आहे. या कॅप्शनवरून अंदाज येऊ शकतो की शिखर किती आपल्या मुलाला मिस करत असेल. 

Read More