Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."

Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो

Shikhar Dhawan On Virat Kohli Birthday: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली युवकांच्या गळ्याचा ताईत... आज आणि सर्वांचा लाडका विराट 34 वा वाढदिवस (Virat Kohli Birthday) साजरा करतोय. जगभरातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. अशातच आता टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवने विराटबाबत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला Dhawan?

शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना धवन म्हणाला, विराट कोहली T20 World Cup स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय. विराट वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल, अशी आशा देखील त्याने यावेळी व्यक्त केली आहे.

विराट हा खूप मजबूत आत्मविश्वास असलेला खेळाडू आहे, जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता तेव्हा त्याच्यामध्ये खूप सकारात्मक जाणवते. हे सर्व तुम्ही स्वतःला कसं घेता यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमचा सर्वात चांगला मित्र होऊ शकता, हे पूर्णपणे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे, असंही शिखर धवन म्हणाला आहे. त्यावेळी शिखरने विराटचा एक किस्सा देखील सांगितलाय.

आणखी वाचा- Virat Kohli Birthday: "आज तू जो काही आहेस...", युवराजकडून लाडक्या चिकूसाठी 'तो' खास VIDEO शेअर!

धवन म्हणतो, Virat पूर्वी खूप लठ्ठ होता...

दरम्यान, विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं वेळेनुसार आपल्या इच्छेनं स्वत:मध्ये बदल केले. फिट राहण्यास सुरूवात केली. चांगला डाएट फॉलो केला. त्यानंतर त्याच्या कौशल्यानं त्याला यश मिळवून दिलंय, असंही शिखर धवन म्हणाला आहे.

Read More