Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराटला त्याने म्हटलं टॉम अँड जेरीमधला 'बदमाश बिल्ला'

पाहा विराटला कोणी म्हटलं टॉम

विराटला त्याने म्हटलं टॉम अँड जेरीमधला 'बदमाश बिल्ला'

नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताने 3 सामन्यांचा टी-20 सीरीज जिंकल्यानंतर इंग्लंडने वनडेमध्ये भारतावर 2-1 ने मात केली. आता 1 ऑगस्टपासून टीम इंडिया टेस्ट सिरीज खेळणार आहे. 11 सप्टेंबरपर्यंत 5 सामन्यांची ही टेस्ट सिरीज चालणार आहे. टीम इंडिया सध्य़ा इंग्लंडमध्ये मस्ती करत आहेत. कुटुंब आणि इतर खेळाडूंसोबत ते वेळ घालवत आहेत. खेळाडूंनी सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत. शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

 

Tom nd jerry waala badmaash billa @virat.kohli aur main jagga jatt

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

शिखर धवनने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीला त्याने कार्टून कॅरेक्टर टॉम अँड जेरी कार्टून मालिकेतील टॉमची उपमा दिली आहे. या फोटोमध्ये विराट कोहली एका लाल रंगाच्या कॅपमध्ये दिसत आहे. शिखरने विराट टॅग करत त्याला बदमाश बिल्ला असं म्हटलं आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला सामना एक ऑगस्टपासून सुरु होणार आहे. बर्मिंघममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. दूसरी टेस्ट लॉर्ड्समध्ये खेळली जाणार आहे. टी-20 आणि वन-डे सीरीजमध्ये शिखर धवनने चांगली कामगिरी केली. धोनी आणि रैना या सिरीजमध्ये काही खास कामगिरी नाही करु शकले.

Read More