Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

प्रशिक्षिकेचा खेळाडूसोबत 'घाणेरडा' खेळ! कपडे उतरवायला सांगितले, धमकी दिली; आशियाई चॅम्पियन बॉक्सरचा लैंगिक छळ

Indian Boxing player Harassment: अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित प्रशिक्षिका सध्या अजूनही ज्युनिअर आणि युथ बॉक्सर्सच्या नॅशनल कॅम्पमध्ये कार्यरत आहे.  तिला जबाबदारीवरून हटवलेले नाही.  

प्रशिक्षिकेचा खेळाडूसोबत 'घाणेरडा' खेळ! कपडे उतरवायला सांगितले, धमकी दिली; आशियाई चॅम्पियन बॉक्सरचा लैंगिक छळ

National-Level Minor Boxer Alleges Sexual Harassment By Woman Coach: हरयाणातील रोहतकमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI) राष्ट्रीय बॉक्सिंग अकॅडमीत एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. एका 17 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील महिला बॉक्सरने महिला प्रशिक्षिकेविरोधात शारीरिक व मानसिक छळ तसेच लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या पालकांनीही ही एफआयआर दाखल केली  असून, त्यांच्या मते पुन्हा पुन्हा होत असलेल्या अत्याचारामुळे मुलगी सध्या गंभीर नैराश्यात आहे.

प्रशिक्षिकेविरोधात गंभीर आरोप

एफआयआरनुसार, संबंधित प्रशिक्षिकेने एका प्रसंगी पीडितेचे कपडे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला, तिला अनेक वेळा चापट्या मारल्या आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन इतर खेळाडूंसमोर अपमान केला. त्यामुळे तिचे सामाजिक व मानसिक नुकसान झालं आणि तिला एकटं पाडलं गेलं.

हे ही वाचा: वेस्टइंडीज क्रिकेटरवर 11 महिलांच्या बलात्काराचा आरोप; मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ' मी जज नाही. पण...'

BFI व SAI म्हणते, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख नव्हता

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) आणि SAI दोघांनीही या तक्रारीची कबुली दिली असून, त्यांनी अंतर्गत चौकशी केली होती. पण त्यात लैंगिक अत्याचाराचा कोणताही स्पष्ट उल्लेख नव्हता, असा त्यांचा दावा आहे. दोन्ही संस्थांनी सांगितले की, त्यांनी पीडितेच्या मेलवरून आलेल्या तक्रारीची चौकशी केली होती, मात्र लैंगिक शोषणासंबंधी कोणतीही गोष्ट त्या तक्रारीत नमूद नव्हती. तरीही पीडितेच्या पालकांनी पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 , 351 (3)  आणि POCSO कायद्यातील कलम 10  अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

पालकांचे आरोप 

पीडितेच्या पालकांनी सांगितले की, आयर्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेदरम्यान प्रशिक्षिकेने सतत अपमान व शारीरिक त्रास दिला. तिला शिक्षा म्हणून कठोर व्यायाम करायला लावण्यात आला. एवढंच नाही, तर सामन्यादरम्यान तिच्यासोबत कोणताही प्रशिक्षक रिंगमध्ये नव्हता आणि तिला एकटं टाकण्यात आलं. तिने मोबाइलमध्ये कोणाशी बोलल्याचा संशय घेत प्रशिक्षिकेने तिचा फोन, पासवर्ड आणि डायरी जबरदस्तीने घेतली. जेव्हा मुलीने विरोध केला तेव्हा तिला मारहाण केली गेली. प्रशिक्षिकेने रूममध्ये लॉक करून तिच्या अंगावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला. तिचे कपडे काढण्याचा प्रयत्नही केला."

हे ही वाचा: Mohammed Shami-Hasin Jahan: 'माझ्या विरोधात भ्रष्ट अधिकाऱ्यांना...', न्यायालयाच्या निर्णयानंतर हसीन जहाँचा गंभीर आरोप

 

आम्ही सहकार्य करणार, पण पुरावे नाहीत

SAI ने स्पष्ट केलं की त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून इतर खेळाडू किंवा स्टाफकडून अशा प्रकाराचे कोणतेही समर्थन किंवा साक्ष मिळाल्या नाहीत. त्यांनी हेही म्हटलं की, “आम्ही कोणत्याही तपास यंत्रणेला आवश्यक तेव्हा सहकार्य करू.”

पीडितेची अवस्था गंभीर 

पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी सध्या नैराश्याच्या अवस्थेत आहे. एका सहकारी खेळाडूकडून ते घडलेल्या प्रकाराची माहिती समजल्यावर ते तातडीनं रोहतकला पोहोचले, जिथे मुलीने सर्व प्रकार उघड केला.

हे ही वाचा: RCBच्या 'या' खेळाडूवर महिलेने लावले लैंगिक शोषणाचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध, FIR दाखल

प्रशिक्षिका अजूनही पदावर कार्यरत 

अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित प्रशिक्षिका सध्या अजूनही ज्युनिअर आणि युथ बॉक्सर्सच्या नॅशनल कॅम्पमध्ये कार्यरत आहे. BFI आणि SAI यांनी तिला जबाबदारीवरून हटवलेले नाही.

Read More