Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अभिनेता सोनू सूदने जिला रायफल दिली तिनेच जीवन संपवलं

कोनिका एवढ्या टोकाचं पाऊल उचलेल यावर कोणालाही विश्वास नव्हता. 

अभिनेता सोनू सूदने जिला रायफल दिली तिनेच जीवन संपवलं

नवी दिल्ली: सोनू सूदने जिला रायफल गिफ्ट केली तिनेच आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील धनबाद शहरातील रहिवासी राष्ट्रीय नेमबाज कोनिकानं आपलं जीवन संपवलं आहे. 

कोनिका एवढ्या टोकाचं पाऊल उचलेल यावर कोणालाही विश्वास नव्हता. कोनिकाच्या मृत्यूमुळे देशभरात शोककळा पसरली. आता अभिनेता सोनू सूदने कोनिकाच्या जाण्यावर शोक व्यक्त केला.

सोनू सूदने कोनिकाला सरावासाठी 2 लाख 70 हजार रुपयांची रायफल दिली होती. कोनिकाच्या जाण्याने धनबाद नाही तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. तिने कोलकातामध्ये राहून शूटिंग अॅकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत होती.

fallbacks 

कनिकाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कोनिका असं टोकाचं पाऊल उचलणार नाही असा विश्वास तिच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. कोनिकाच्या हत्येचा कट रचल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. 

ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये झालेल्या स्पर्धेत कोनिकाने सहभाग घेतला होता. त्यानंतर कोलकाता इथे ती ट्रेनिंग घेण्यासाठी गेली होती. तिने 11 व्या झारखंड स्टेट रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये आपली प्रतिभा दाखवली होती. 

कनिकाने सराव करताना ५० मीटर रायफल नेमबाजीत सुवर्ण आणि ५० मीटर रायफल प्रोन फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले होते. तिच्या अचानक टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

कोनिकाने सरकारकडे मदत मागितली होती. त्यानंतर अभिनेता सोनू सूदकडे देखील तिने मदत मागितली होती. त्यावर तातडीने सोनू सूदने तिला मदत केली होती. सोनू सूदने यावर्षी 10 मार्च रोजी कोनिकाला रायफल देण्याचे वचन दिले. 

24 मार्च रोजी तिच्या घरी जर्मन रायफल पाठवली. सोनूने कोनिकाशी व्हिडीओ कॉलवरही बोलले. यादरम्यान ती ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकेल असं  कोनिकाने वचन दिले होते. 

Read More