IPL 2025 : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स (Sunrisers Hydrabad VS Punjab Kings) यांच्यात शनिवारी आयपीएल 2025 चा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात हैदराबादने पंजाबला 9 बॉलमध्ये 8 ने पराभूत केले. या सामन्यादरम्यान असं काही घडलं जेव्हा पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर थेट अंपायरवर भडकला. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 245 धावा केल्या होत्या. तर सनरायजर्स हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये 246 धावा करून मोठं टार्गेट चेज केलं.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करून सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी मोठं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना सनरायजर्स हैदराबादच्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरला मैदानातील अंपायरने पंजाब किंग्सचा स्पिनर ग्लेन मॅक्सवेलने टाकलेल्या दुसऱ्या बॉलवर वाईड करार दिला. ग्लेन मॅक्सवेल यामुळे नाखुश दिसला आणि त्याने अंपायरकडे पाहून 'टी' चा इशारा करत डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (DRS) ची मागणी केली. फिल्डिंग संघाकडून जेव्हा DRS ची मागणी होते तेव्हा ऑन-फील्ड अंपायर नेहमी पहिले फिल्डिंग करणाऱ्या कर्णधाराला रिव्ह्यूबाबत विचारतात आणि मग थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवतात.
April 12, 2025
पंजाब किंग्सचा स्पिनर ग्लेन मॅक्सवेलने 'टी' चा इशारा करून ऑन-फील्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. पण यावेळी अंपायरने कर्णधार श्रेयस अय्यरला अजिबात विचारात न घेता त्यांनी मॅक्सवेलची मागणी स्वीकारली. यावरून पंजाब किंग्सचा गोलंदाज श्रेयस अय्यर हा अंपायरवर भडकला. त्याने रागात अंपायरकडे पाहून म्हटले, 'अंपायर, आधी मला विचारना'. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हेही वाचा : अभिषेक शर्माने शतकाचे क्रेडिट दिले टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंना , सामन्यानंतर मानले आभार
पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेलं मोठं टार्गेट पूर्ण करताना अभिषेक शर्मा याने दमदार फलंदाजी केली. ट्रेव्हिस हेड सोबत सलामीसाठी आलेल्या अभिषेकने 55 बॉलमध्ये 141 धावा केल्या. तर हेडने 66 धावांची खेळी केली. हैदराबादकडून अभिषेक आणि ट्रेव्हिस हेडने 171 धावांची पार्टनरशिप केली आणि 18.3 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 247 धावाकरून संघाला विजय मिळवून दिला.