IND VS AUS Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावण्याच्या हेतूने सुरुवातीपासूनच टीम इंडिया (Team India) प्रत्येक सामन्यात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत आहे. विराट कोहली, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू मैदानात एक एक धाव वाचवण्यासाठी झोकून फिल्डिंग करतायत. टीम इंडियाने 4 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध जबरदस्त फिल्डिंग केली. खास करून श्रेयस अय्यरने आपल्या रॉकेट थ्रोने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला रनआउट करून तंबूत धाडले. श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) स्टंपवरील अचूक मारा पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. सध्या याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करता असताना 48 वी ओव्हर हार्दिक पंड्याने टाकली. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर एलेक्स कॅरी स्ट्राईकवर होते. कॅरीने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटत होतं की श्रेयस अय्यर बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाही, पण अय्यर तेथे पोहोचला आणि त्याने रॉकेटच्या वेगाने स्टंपवर निशाणा साधून एलेक्स कॅरीला बाद केले. श्रेयसने लांबून टाकलेला बॉल थेट स्टंपवर जाऊन बसला आणि एलेक्स कॅरी क्रीजपासून खूप दूर होता. श्रेयस अय्यरचा हा अचूक थ्रो पाहून सर्वच थक्क झाले. त्याच्या या थ्रोमुळे भारतीय संघात उत्साह संचारला. एलेक्स कॅरी हा 57 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 61 धावा करून बाद झाला.
हेही वाचा : हातावरचं बँडेज काढ...; Live सामन्यात अंपायरने रवींद्र जडेजावर घेतला आक्षेप
The European Lad (TheEuropeanDadd) March 4, 2025
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकून पहिले फलंदाजी निवडली. यावेळी ऑस्ट्रेलियाने 49.3 ओव्हरमध्ये 264 धावा करून ऑल आउट झाला. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 73 धावा कर्णधार स्टीव स्मिथने केल्या. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स या मोहम्मद शमीने काढल्या. तर वरूण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा यांनी 2 विकेट्स घेतल्या आणि हार्दिक पंड्या तसेच अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 265 धावांचे टार्गेट दिलं आहे.