India vs England 2nd Test Day 2: एजबॅस्टनच्या मैदानावर भारतीय कर्णधार शुभमन गिलनं इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त द्विशतक ठोकलं. या द्विशतकासह त्याने एकापाठोपाठ विक्रमांची मालिका रचली. या खेळीमधून गिलनं ना फक्त भारताला भक्कम स्थितीत आणलं, तर मोहम्मद अझरुद्दीनचा 35 वर्षांपूर्वीचा जुना विक्रमही मोडीत काढला आहे. शुभमन गिलनं त्याच्या डावात 311 चेंडूंत 200 धावा केल्या. यामध्ये त्याच्या बॅटमधून 21 चौकार आणि 2 जबरदस्त षटकार निघाले. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर ठरला आहे.
शुभमन गिल आता इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीननं 1990 साली 179 धावा केल्या होत्या. या विक्रमालाही शुभमन गिलनं मागे टाकलं आहे.
224 - शुभमन गिल (2025)*
179 - मोहम्मद अझरुद्दीन (1990)
149 - विराट कोहली (2018)
Maiden DOUBLE-CENTURY for Shubman Gill in Test Cricket!
— BCCI (@BCCI) July 3, 2025
What a knock from the #TeamIndia Captain!
Updates https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/JLxhmh0Xcs
सेना (SENA) देशांतील (South Africa, England, New Zealand, Australia) कसोट्यांमध्ये भारतीय कर्णधारांचे सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर करणारे खेळाडू कोण आहेत ते बघुयात.
200 - शुभमन गिल, इंग्लंड (2025)*
192 - अझरुद्दीन, न्यूझीलंड (1990)
179 - अझरुद्दीन, इंग्लंड (1990)
169 - सचिन तेंडुलकर, दक्षिण आफ्रिका (1997)
153 - विराट कोहली, दक्षिण आफ्रिका (2018)
149 - विराट कोहली, इंग्लंड (2018)
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे कसोटी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. पहिल्याच कसोटीत, लीड्समध्ये, गिलनं जोरदार 227 चेंडूत 147 धावा केल्या होत्या.
Leading from the front
— BCCI (@BCCI) July 3, 2025
First Indian Captain to register a double-century in Test cricket in England
Updates https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/Pm7pq7GRA9
दुसऱ्या डावात जरी गिल फक्त 8 धावा करून बाद झाला असला, तरी दुसऱ्या कसोटीत त्यानं केलेल्या द्विशतकाने तो भारताच्या कसोटी इतिहासात एक वेगळंच स्थान मिळवून गेला आहे.