Shubman Gill Reaction on Wedding Plan: शुभमन गिल हा सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात चर्चेत असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. फक्त त्याच क्रिकेटचं करियरच नाही तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शुभमन तरुण आहे, पर्सनॅलिटी छान आहे आणि त्याच्या देखण्या लूकमुळे त्याच्या अनेक महिला चाहत्यांनाही तो खूप आवडतो. गेल्या काही दिवसांपासून शुभमन त्याच्या नात्याबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत राहतो. आता शुभमन गिलच्या लग्नाशी संबंधित एक अनोखी स्टोरी समोर आली आहे. खरंतर, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यापूर्वी टॉस दरम्यान, डॅनी मॉरिसनने शुभमन गिलला त्याच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारला.
फलंदाजी करण्यापूर्वी, शुभमन नाणेफेकीदरम्यान दिलेल्या उत्तराने चर्चेत आला. टॉस दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी त्यांना एक विचित्र प्रश्न विचारला. शुभमनला यावर लाजला. डॅनी मॉरिसनने त्याला विचारले, "तू छान दिसत आहेस, लवकरच लग्नाची शहनाई वाजणार आहे का?" तू लवकरच लग्न करणार आहेस का?" या अनपेक्षित प्रश्नावर गिल लाजला आणि नंतर उत्तर दिले, "नाही, असं काही नाहीये."
हे ही वाचा: पुन्हा एकदा पराभव! आता अजिंक्य रहाणे कोणावर फोडले पराजयाचे खापर? म्हणाला," मला गोलंदाजांबद्दल..."
Danny Morrison - You're looking good, wedding bells around the corner? Getting married soon?
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2025
Shubman Gill - No, nothing like that. pic.twitter.com/2wtfF2HmN0
हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral
शुभमन गिलने स्वतः सध्या कोणाला डेट करत आहे याबद्दल काहीही सांगितलेले नाही, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून तो टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरत आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अवनीत कौर दुबईमध्ये भारताच्या सामन्याचा आनंद घेताना दिसली. त्यानंतर, शुभमन गिलसोबत तिच्या नातेसंबंधाच्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या. यापूर्वी गिलचं नाव सारा अली खान आणि सारा तेंडुलकरशीही जोडले गेले होते.
हे ही वाचा: शाकाहारी असूनही विराट कोहली खातो 'हे' खास मांस... ते काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
शुभमन गिल आणि डॅनी मॉरिसन यांच्यातील हा संवादाचा व्हिडीओ व्हायरल काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या नात्यामुळे शुभमन बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. दोघांनीही याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. अलिकडेच दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आले आहे.