Shubman Gill hunts for someone: टीम इंडियाने एजबेस्टनमध्ये इतिहास रचला आहे. त्यांनी ते साध्य केले आहे जे आतापर्यंत धोनी-विराट यांच्यावेळीही साध्य झाले नव्हते. भारतीय क्रिकेट संघाने एजबेस्टन मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे या विजयाचं नेतृत्व केलं होतं युवा खेळाडू कॅप्टन शुभमन गिलने. शुभमन गिल एजबेस्टनमध्ये विजयाची चव चाखणारा पहिला भारतीयच नाही तर पहिला आशियाई कर्णधारही बनला आहे. पण सामना संपताच, जेव्हा संघ एकत्र सेलिब्रेट करत होता, तेव्हा गिल मात्र कुणालातरी शोधत होता. प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांनी स्पष्टपणे विचारलं, "तो कुठे आहे?"
सामना संपल्यानंतर गिल ज्याला शोधत होते, तो त्यांचा संघातील खेळाडू, कोच, किंवा स्टाफ नव्हता. तुम्हाला जाणून आश्यर्च वाटेल की ती व्यक्ती होती एक पत्रकार! हो, गिलने पत्रकार परिषदेत त्याचं नाव न घेता, त्याला आपला ‘फेव्हरेट जर्नलिस्ट’ म्हणून संबोधलं आणि विचारलं "तो इथे आहे का?" (Wheres My Favourite Journalist? Shubman Gill Press Conference)
शुभमन गिल एका पत्रकाराचा शोध का घेत होता? काय कारण होतं यामागे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना. तर, या पत्रकाराने एजबेस्ट टेस्ट सुरू होण्याआधी गिलला भारताच्या या मैदानावरील खराब रेकॉर्डबद्दल विचारलं होतं. त्यावर शुभमन गिलने आत्मविश्वासाने उत्तर दिलं होतं की, “आम्ही आकडे पाहून खेळत नाही, आमची टीम वेगळी आहे आणि आम्ही कुठेही जिंकू शकतो.”
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने एजबेस्टवर ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवला, जो केवळ इंग्लंडमध्येच नाही तर एकूणच परदेशातला भारताचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारत कधीच एजबेस्टवर टेस्ट सामना जिंकला नव्हता, पण गिलने इतिहास बदलला. त्यामुळे सामना संपल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, “तो पत्रकार कुठे आहे?” कारण जे काही सांगितलं होतं, ते गिलच्या सेनेने करून दाखवलं होतं.
I asked the question… and Shubman roasted the British journalist with a smile
— Ankan Kar (@AnkanKar) July 6, 2025
Watch the full clip — this one’s gold! #ENGvIND #ShubmanGill #PressConference pic.twitter.com/kCwv65TNTH
शुभमन गिलने पुढे म्हटलं, "जर सगळं ठीक चाललं, तर ही मालिका आम्ही अशी खेळू की ती प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात राहील." खरच गिलची खेळी, नेतृत्वशैली आणि आत्मविश्वासाने भारतासाठी एक नवा इतिहास घडवला आहे.