Shubman Gill And Sara Tendulkar : सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून येथे ते 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळत आहेत. यातील आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना हा इंग्लंडने तर दुसरा सामना हा भारतानं जिंकलेला आहे. सीरिजमधील तिसरा सामना हा लॉर्ड्स मैदानावर 10 जुलै पासून सुरु झाला. मात्र त्यापूर्वी माजी क्रिकेटर युवराज सिंहने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिल सुद्धा आपल्या संघासोबत तिथे आला होता. यावेळी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघे समोरासमोर आले दोघांची नजरानजर झाली, पण त्यानंतर गिलने जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामुळे शुभमन आणि सारा यांच्यातील संबंधांच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. युवराज सिंहच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेन्टमध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी सचिन तेंडुलकर सह त्याची मुलगी सारा सुद्धा उपस्थित होती. नुकतीच दुसरा टेस्ट सामना जिंकलेल्या टीम इंडियाच्या टेस्ट संघाचं सुद्धा इथे आगमन झालं. यावेळी कर्णधार शुभमन गिल स्टेजवर जात होता, त्यावेळी सारा तेंडुलकर जवळच्याच टेबलवर बसली होती. गिल साराच्या समोरून गेला परंतु त्याने तिच्याकडे पाहून न पहिल्या सारखं केलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर फॅन्सचं म्हणणं आहे की साराने गिलकडे पाहिलं पण गिलने ते इग्नोर केलं.
In the first video, Shubman Gill ignored Sara, but in the second one, he was lowkey watching her.
Rohan (rohann45) July 9, 2025
Blud is so shy man pic.twitter.com/eLcnNnIXqM
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर या दोघांचं नाव मागील बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत जोडलं जातंय. मात्र दोघांनी त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मध्यंतरी गिलचं नाव अवनीत कौरशी सुद्धा जुडलं गेलं होतं, त्यानंतर सारा आणि गिलचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. आता सारा आणि शुभमन हे दोघे बऱ्याच काळानंतर एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिप स्टेट्स विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा : जसप्रीत बुमराहवर अचानक झाला 'अटॅक', लॉर्ड्सवर थांबवावी लागली चालू टेस्ट मॅच, Video
टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार म्हणून शुभमन गिल हा प्रथमच टेस्ट सामना खेळत आहे. इंग्लंड विरुद्ध टेस्टमधील पहिल्या दोन सामन्यात त्याने फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शुभमनने पाहिल्या टेस्ट सामन्यात शतक केलं. तर दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक ठोकलं. तर याच सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा शुभमनने शतकीय कामगिरी केली.