Ind vs Eng 5th Test: ओव्हलवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारतीय संघाची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारताने केवळ 83 धावांपर्यंत तीन महत्त्वाचे विकेट गमावल्या. त्यात कर्णधार शुभमन गिलचं रनआउटनं विशेष लक्ष वेधून घेतलं.
शुभमन गिलची विकेट अक्षरशः गिफ्टसारखी इंग्लंडला मिळाली. पारीच्या 28व्या षटकात गस एटकिंसनच्या दुसऱ्या चेंडूवर गिलने शॉर्ट कव्हर दिशेने हलकासा डिफेन्स केला. चेंडू एटकिंसनपासून फार दूर नव्हता. तरीही गिल धाव घेण्यासाठी पुढे सरसावले. त्याच वेळी एटकिंसनने चपळतेनं डावीकडे झेप घेत चेंडू पकडला आणि डायरेक्ट थ्रो करत गिलला स्ट्रायकर एंडवर धावबाद केलं.
गिलसोबत बॅटिंग करत असलेल्या साई सुदर्शनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण गिलच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना रनआउटचा फटका बसला. साई स्वतः एक पाऊल पुढे सरसावले असले तरीही ही चूक पूर्णपणे शुभमन गिलचीच होती, हे स्पष्ट होतं.
React. Pick-up. Strike.
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
Clinical from Gus Atkinson pic.twitter.com/aM3RbgBvjp
डगआउटमध्ये बसलेला टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हा गिलच्या रनआउटनंतर नाराज दिसला. एका सुसंगत आणि संयमी डावासाठी योग्य संधी असूनही गिलने तो योग्य पद्धतीने न खेळता निष्काळजीपणे विकेट दिल्याचं चित्र होतं.
शुभमन गिलने 35 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या, ज्यामध्ये 4 सुंदर चौकारांचा समावेश होता. पण हा दुसऱ्यांदा आहे की गिल कसोटीत रनआउट झाला आहे. मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीतही असाच प्रसंग घडला होता. यावेळी गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण एक चुकीचा निर्णय त्याच्या विकेटसह भारताच्या फलंदाजीवरही ताण आणून गेला. क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक निराशाजनक क्षण ठरला.