Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

केपटाऊन :  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ होतोय व्हायरल

SPNSportsIndia या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. त्यात धोनी कशी सामन्यावर आपली पकड ठेवतो. हे दाखविले आहे.  सामन्यात फलंदाज करत असताना किंवा भारताचे क्षेत्ररक्षण असेल त्यावेळी धोनी कायम आदेश देत असतो. त्या आदेशांचे भारतीय संघाचे खेळाडू पालन करतात.  तसेच कर्णधार विराट कोहलीही या आदेशाचे पालन करताना दिसत आहे. 

स्टंप माईकमधून गुपीत उघड  

हा व्हिडिओ सामन्यातील काही क्षणचित्रे एकत्र करून तयार करण्यात आला आहे. त्यात स्टंप माईकच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. त्यात हे आदेश आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. तो चहल आणि कुलदीप यादव याला आदेश देत असताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे ऐकूही येत आहे. 

विराटही धोनीचे आदेश ऐकतो 

तसेच कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षण लावणे अपेक्षीत आहे. पण धोनीच्या डोक्यातून फिलिंगची रचना ठरते.  धोनी हा विराटलाही मागे राहण्याचे आदेश देतो. पाहा काय आहे या व्हिडिओमध्ये...

 

धोनी कर्णधार जरी नसला तरी त्याचा अनुभवाचा फायदा तो नेहमी आपल्या संघाला करून देतो. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू म्हणून कोहलीही त्याला खूप मान देतो. 

 

Read More