Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बापरे बाप! कोब्रा आणि माकडासह सामन्याला पोहोचला गारुडी! श्रीलंका-बांग्लादेश कसोटीत दिसले विचित्र दृश्य

Bangladesh vs Sri Lanka: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॅले कसोटी सामना रंगला. त्यावेळी मैदानावर एक अद्भुत दृश्य दिसले. प्रत्यक्षात, साप आणि माकडासोबत सामना पाहण्यासाठी एक गारुडी (Snake Charmer) पोहोचलेला.   

बापरे बाप! कोब्रा आणि माकडासह सामन्याला पोहोचला गारुडी! श्रीलंका-बांग्लादेश कसोटीत दिसले विचित्र दृश्य

A Snake Charmer spotted in Galle: गॉल इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंका-बांग्लादेश कसोटी मालिकेतील (Bangladesh vs Sri Lanka) पहिला सामना अनिर्णीत राहिला. मात्र, या सामन्याच्या पाचव्या दिवशी मैदानावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक गारुडी थेट कोब्रा साप आणि माकडासह सामना पाहायला स्टेडियममध्ये पोहोचला होता. हे दृश्य बघून सगळेच चक्रावले होते. 17 ते 21 जूनदरम्यान पार पडलेल्या या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या माजी कर्णधार एंजेलो मैथ्यूजने आपल्या कसोटी करियरचा शेवट केला. आता या मालिकेतील दुसरा सामना 25 जूनपासून कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे.

गारुडीचं मैदानावर आगमन... 

गॉल टेस्टच्या शेवटच्या दिवशी, 21 जूनला एक धक्कादायक दृश्य बघायला मिळालं. एका गरुडाची एन्ट्री मैदानावर झाली. त्या गारुडीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर तीन टोपल्या होत्या, ज्यात दोन टोपल्यांत कोब्रा साप दिसत होते. त्याने एक साप हातात धरलेला होता. विशेष म्हणजे त्याच्यासोबत एक माकडही होतं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

 

'असा' रंगला सामना

या कसोटीत बांग्लादेशने पहिल्या डावात 495 धावा केल्या, तर श्रीलंकेचा डाव 485 धावांवर आटोपला. बांग्लादेशला 10 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात बांग्लादेशने 6 गडी गमावून 285 धावा करत डाव घोषित केला आणि श्रीलंकेसमोर 296 धावांचं लक्ष्य ठेवलं. अखेरच्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा श्रीलंका दुसऱ्या डावात 4 बाद 72 अशा स्थितीत होती आणि सामना ड्रॉ झाला.

मैथ्यूज झाला भावूक, कसोटी क्रिकेटचा घेतला निरोप

फेअरवेल कसोटीनंतर एंजेलो मैथ्यूज भावूक झाला. त्याने सांगितलं, "संन्यासाच्या निर्णयानंतर जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला, त्यावर विश्वास बसत नाही. हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता, पण चाहत्यांनी आणि संघाने दिलेल्या आधारामुळे मी आज इथवर पोहोचलो." मैथ्यूजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दोन मोठ्या विजयांची आठवण करून दिली. 

 

इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरात मिळालेला विजय आणि श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाला 3-0 ने हरवणं. "हे क्षण माझ्यासाठी अभिमानाचे होते. संघाच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं. माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे मी आभार मानतो, पण सर्वात मोठं आभार माझ्या चाहत्यांचे, जे माझ्या पदार्पणापासून माझ्यासोबत होते." असंही तो म्हणाला.

Read More