Snake Enters LPL 2023 Match Video : पावसाळ्यामुळे अनेक प्राणी त्यांचा बिळातून बाहेर पडतात. अनेक ठिकाणी घरात असो किंवा शेतात साप, अजगर दिसून येतं आहे. नुकताच एका बिल्डिंगच्या टेरेसीवर महाकाय अजगर दिसून आला. या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सापाचे नाव घेतलं तरी भल्या भल्या माणसांना घाम फुटतो. सापाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. (Snake Enters lanka premier league 2023 live Match video viral social media Trending News today )
लंका परमियर लीगमधील सामना रंगात असताना अचानक भला मोठा साप आला आणि मैदानात एकच खळबळ माजली. सुमारे 10 फूट लांबीचा साप मैदानात आला अन् लाईव्ह मॅच एका क्षणात सगळ्यांची धावपळ झाली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मैदानातील सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिनेश कार्तिकने एक ट्वीट केलं आहे.
The naagin is back
— DK (@DineshKarthik) July 31, 2023
I thought it was in Bangladesh #naagindance#nidahastrophy https://t.co/hwn6zcOxqy
त्यात तो म्हणला की, ''मला वाटलं नागिणची एन्ट्री बांगलादेशमध्ये झाली आहे.''