Sohail Khan Spotted with Shefali Bagga: लोकप्रिय अँकर शेफाली बग्गाचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोमवारी शेफाली बग्गा वानखेडे स्टेडियमवर IPL सामना पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी स्टेडियमवर तिच्यासोबत सोहेल खान देखील होता. शेफालीने तिच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शेफाली बग्गा आणि सोहेल खान दोघेही एकत्र IPL सामना पाहिल्यानंतर एकत्र दिसले. यावेळी त्यांनी पापाराझींसाठी पोजही दिल्या आणि लगेच गाडीमध्ये बसून ते दोघे निघून गेले.
दरम्यान, शेफाली बग्गाने फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, एक RCB चाहता आहे आणि एक मुंबई इंडियन्स चाहता आहे. कोण कोण आहे ते सांगा? फोटोंमध्ये ती सोहेल खानसोबत पोज देखील देताना दिसत आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी आणि उत्साहित दिसत आहे. यावेळी शेफालीने जय भानुशालीसोबत देखील पोज दिल्या. IPL चा सामना पाहण्यासाठी शेफालीने पिवळ्या रंगाचा जिम आउटफिट परिधान केला होता. त्यासोबतच जॅकेट देखील परिधान केले होते. यावेळी शेफालीच्या पोस्टवर जय भानुशालीने कमेंट केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले की, हे खूप लवकर झाले, पण मुंबई इंडियन्स जिंदाबाद.
शेफालीला बिग बॉस 13 मधून प्रसिद्धी
शेफाली बग्गाला बिग बॉस 13 मधून अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. ती एक क्रीडा पत्रकार आहे. ती होस्टिंग देखील करते आणि त्यासोबतच म्युझिक व्हिडीओमध्ये देखील तिने काम केलं आहे. ती शेवटची दिग्विजय राठी सोबत बेपरवाहियां या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.
सोहेल खानबद्दल बोलायचं झालं तर त्याने सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. दोघांचेही लग्न 1998 मध्ये झाले होते. मात्र, 3 वर्षांपूर्वी 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सोहेल खान आणि सीमा सजदेह याचा घटस्फोट झाला. त्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. सोहेल खान आणि सीमा यांना दोन मुले आहेत. सोहेल खानच्या मुलांची नावे निर्वाण आणि योहान आहेत.