Sourav Ganguly : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने जवळपास तीन वर्षांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा बंगाल क्रिकेट संघ (सीएबी) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो. भारताच्या महान कर्णधारांमध्ये सौरव गांगुली हा मागच्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडण्यात आला होता. आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की सीएबी च्या निवडणुकीत त्याच्या विरोधात कोणी उभं राहतं की यावेळी सुद्धा त्याची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होते.
सौरव गांगुलीने 2014 मध्ये बंगाल क्रिकेट संघाचं सचिव म्हणून कामकाज पाहिलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये तो बीसीसीआय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आला. गांगुलीच्यानंतर 1983 वर्ल्ड कपचे हिरो रोजर बिन्नी हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. 52 वर्षांचा सौरव गांगुली पुन्हा एकदा प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्याच्या दिशेकडे वळू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली गेल्या काही महिन्यांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांशी नियमितपणे संपर्क साधत आहे. संघातील अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की 'दादा' सारख्या व्यक्तीने प्रशासनात परत यायला हवे.
सीएबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'हो. सौरव गांगुली हे प्रशासनामध्ये परतण्यासाठी उत्सुक आहेत. सीएबी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, त्याच्याकडे राज्यात एकूण नऊ वर्षांपैकी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र सौरव गांगुलीची अध्यक्षपदासाठी निवड एकमताने होईल की निवडणूक होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : RCB च्या माजी खेळाडूने अडल्ट साइटवर खोललं अकाउंट, म्हणाला 'मी इथे पॉर्न....'
सध्या सीएबीचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली हे आहेत. स्नेहाशीष गांगुली हे सौरव गांगुलीचे मोठे भाऊ असून ते आता अध्यक्ष म्हणून सहा वर्ष पूर्ण होणार आहेत. यानंतर, त्याला अनिवार्य कूलिंग-ऑफ वेळेनुसार पद सोडावे लागू शकते. हे देखील मनोरंजक आहे की सीएबी मध्ये, एका भावाच्या जागी दुसरा भाऊ येईल. पीटीआयने याबाबतच वृत्त दिलं आहे.
1. सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाची सीएबीमधील भूमिका काय आहे?
सौरव गांगुलीचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुली सध्या सीएबीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि लोढा समितीच्या नियमांनुसार (कार्यकाळ मर्यादा) त्यांना आता पद सोडावे लागेल
2. सौरव गांगुलीला सीएबीच्या सदस्यांचा पाठिंबा का आहे?
सीएबीमधील अनेक सदस्यांचा असा विश्वास आहे की, सौरव गांगुलीसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाची प्रशासनात गरज आहे. त्याच्या मागील यशस्वी कार्यकाळामुळे आणि बंगाल क्रिकेटच्या विकासासाठीच्या त्याच्या दृष्टीकोनामुळे त्याला पाठिंबा मिळत आहे.
3. सौरव गांगुली यापूर्वी कोणत्या प्रशासकीय भूमिकांमध्ये होता?
सौरव गांगुलीने 2014 मध्ये सीएबीचा सचिव म्हणून काम पाहिले आणि 2015 ते 2019 पर्यंत सीएबीचा अध्यक्ष होता. त्यानंतर 2019 मध्ये तो बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडला गेला, जिथे त्याने 2022 पर्यंत काम केले.