Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टेम्बा बावुमा खरंच सचिन तेंडुलकरपेक्षा उंच? दोघांचा एकत्र फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Temba Bavuma Height: टेम्बा बावुमा सचिन तेंडुलकरपेक्षा उंच आहे का? दोघांच्या उंचीमध्ये फरक काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. 

टेम्बा बावुमा खरंच सचिन तेंडुलकरपेक्षा उंच? दोघांचा एकत्र फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Temba Bavuma Height: जसा कॅप्टन असतो तशी टीम असते. आणि दक्षिण आफ्रिकेला याचा अभिमान असला पाहिजे की त्याचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे. ज्याने कॅप्टन्सी स्वीकारल्यापासून त्यांनी एकही कसोटी गमावलेली नाही. आणि आता दक्षिण आफ्रिकेने 28 वर्षानंतर पहिल्यांदाच WTC फायनल जिंकली. यानंतर जगभरात टेम्बाची चर्चा आहे. टेम्बाच्या समोर उंच ऑस्ट्रेलियन खेळाडू उभे असलेला एक फोटोही व्हायरल होतोय. यात टेम्बा उंचीने खूप लहान दिसत असला तर त्याच्या पराक्रमाचे कौतुक केलं जातंय. दरम्यान  टेम्बा आणि सचिन तेंडुलकरच्या उंचीची तुलना केली जातेय.

दोघांच्या उंचीमध्ये प्रत्यक्षात किती फरक 

टेम्बा बावुमा सचिन तेंडुलकरपेक्षा उंच आहे का? दोघांच्या उंचीमध्ये फरक काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कमी उंचीच्या क्रिकेटपटूंबद्दल आपण बोलतो तेव्हा प्रत्येकाचे मोजमाप सचिनच्या स्केलवर केले जाते. आता सचिन काहींपेक्षा उंच आणि काहींपेक्षा कमी आहे. टेम्बा बावुमाच्या बाबतीत ते प्रमाण काय आहे?  दोघांच्या उंचीमध्ये प्रत्यक्षात किती फरक ? काही फरक आहे की नाही? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

टेम्बा आणि सचिनच्या उंचीमधील फरक

सचिन तेंडुलकरच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर, तो 5 फूट, 5 इंच असल्याचे म्हटले जाते. म्हणजे सेंटीमीटरमध्ये मोजल्यास तो १६५ सेंटीमीटर उंच आहे. या स्केलवर टेम्बा बावुमा कुठे आहे? हे जाणून घेऊया. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेम्बा बावुमाची उंची फक्त 162 सेंटीमीटर आहे. म्हणजे तो 5 फूट 4 इंच उंच आहे. आता या दृष्टिकोनातून हे स्पष्टपणे म्हणता येईल की सचिन तेंडुलकर टेंबा बावुमापेक्षा उंच आहे. टेंबा बावुमा आणि दोघांमध्ये ३ सेंटीमीटर अंतर आहे.

फोटो पाहून होईल स्पष्ट 

पण केवळ या आकडेवारीच्या आधारे माहिती घेण्यासोबतच दोघांचा फोटोदेखील पाहू. म्हणजे सचिन टेंबा बावुमापेक्षा किती उंच आहे, हे तुमच्या लक्षात येईल. टेम्बा बावुमा आणि सचिनचा जानेवारी 2022 मध्ये काढलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये सचिनला त्याचा आदर्श मानणारा बावुमा त्याच्यासोबत उभा दिसतो. एकत्र उभे राहिल्यामुळे दोघांच्या उंचीचा देखील अचूकपणे अंदाज लावला येतो. ज्यामध्ये सचिन टेंबापेक्षा उंच दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेंबापेक्षा लहान खेळाडू

सचिन तेंडुलकरपेक्षा लहान असूनही, टेंबा बावुमा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात लहान खेळाडू नाही. त्याच्यापेक्षा लहान खेळाडू देखील झाले आहेत. ज्यात भारताचा गुंडप्पा विश्वनाथ, बांगलादेशचा मोमिनुल हक आणि मुशफिकुर रहीम यांचा समावेश आहे. त्या सर्वांची उंची टेंबा बावुमापेक्षा फक्त एक इंच कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

टेंबा बावुमाला नाव कोणाकडून मिळाले?

बावुमाच्या मते त्याला टेम्बा हे नाव त्याच्या आजीकडून मिळाले. त्याच्या आजीने त्याला हे नाव दिलं. ज्याचा एक विशेष अर्थ आहे. त्याने सांगितले की टेम्बा म्हणजे आशा. या अर्थामुळे त्याच्या आजीने त्याचे हे नाव ठेवले होते. त्याच्या नावाच्या अर्थाप्रमाणेच टेम्बाने दक्षिण आफ्रिकेच्या आशा उंचवल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्धच्या त्याचा संघर्ष अद्भुत होता. फलंदाजी करताना त्याच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली. तो जखमी झाला पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही. दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न साकार करणे हे स्वप्न घेऊन तो वेदना आणि त्रास सहन करत खेळत राहिला. टेम्बा बावुमाने दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप फायनल जिंकून देत 1998 नंतर या संघासाठी हे दुसरे आयसीसी जेतेपद ठरले.

Read More