SA VS SL Test Match : एकीकडे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जगभरातील क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहची गोलंदाजी पाहून हैराण आहेत, तिथे अजून एक खेळाडू त्याच्या गोलंदाजीने समोरच्या संघाचा धुव्वा उडवत आहे. साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सध्या टेस्ट सीरिज सुरु असून यातील एका सामन्यात मार्को जॅन्सनने दमदार गोलंदाजी करून श्रीलंकेला फक्त 13 धावा देऊन तब्बल 7 विकेट्स घेतल्या आहेत. जॅन्सनची गोलंदाजी एवढी खतरनाक होती की त्यामुळे श्रीलंकेचा संघ 13.5 ओव्हरमध्ये 42 धावांवर ऑल आउट झाला. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले, ज्यापैकी चौघांना तर मार्को जॅन्सननच पॅव्हेलियनमध्ये धाडले.
मार्को जॅन्सन त्याची ही गोलंदाजी नक्की लक्षात ठेवेल कारण हा त्याच्या टेस्ट करिअरचा आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने यापूर्वी इंग्लंड विरुद्ध 2022 मध्ये 35 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या, आता डरबनने या खेळाडूने दुसऱ्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. मार्को जॅन्सन श्रीलंकेला 13 धावा देऊन 7 विकेट्स घेतले.
मार्को जॅन्सन आता श्रीलंकेविरुद्ध सर्वात चांगली गोलंदाजी करणारा साऊथ आफ्रिकेचा वेगवान फलंदाज ठरणार आहे. त्याने 13 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. 2011 मध्ये मर्चें डी लँगने श्रीलंकेच्या विरुद्ध 81 धावा देऊन 7 विकेट्स नावावर केल्या होत्या. 13 धावा देऊन 7 विकेट्स घेणारा जॅन्सन हा घरच्या मैदानात सर्वात चांगली गोलंदाजी करणारा आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीमुळे साऊथ आफ्रिकेने प्रथमच घरच्या मैदानावर इतक्या कमी धावांनी संघाचा पराभव केला आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेने केलेली ही सर्वात लहान धावसंख्या आहे. यापूर्वी 1994 मध्ये श्रीलंकेने कँडीमध्ये 71 धावा केल्या होत्या.
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) November 28, 2024
Big Jansen making a against#MarcoJansen #SAvsSL #PunjabKings pic.twitter.com/5Xu2nht6zF
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024- 25 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमधील त्याची ही 11वी वेळ आहे. जसप्रीत बुमराहला जागतिक क्रिकेटमध्ये मालिका जिंकणारा गोलंदाज म्हटले जाते. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात आतापर्यंत 13 ओव्हर टाकले आणि 23 धावांत 5 बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 41 टेस्ट सामन्यांच्या 78 डावांमध्ये भारताकडून 178 बळी घेतले आहेत. या काळात जसप्रीत बुमराहने 11 वेळा डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.