Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आशियाई स्पर्धेच्या निवडीचे निकष शिथिल होणार?

क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं पुन्हा कोअर आणि विधी समितीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

आशियाई स्पर्धेच्या निवडीचे निकष शिथिल होणार?

आशियाई स्पर्धेच्या निवडीबाबतचे निकष शिथिल करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्यामध्ये बैठक पार पडली. पदाची शक्यता बळावण्यासाठी आशियाई स्पर्धेसाठी निवडीच्या निकषामध्ये सूट देण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं पुन्हा कोअर आणि विधी समितीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. खेळ आणि खेळाडुंच्या हितासाठी विशिष्ट प्रकरणात निवड निकषांमध्ये सूट देण्यात यावी, असे आवाहन क्रीडा मंत्रालयाने आयओएला केले आहे. 

Read More