Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बर्फाळ विकेटवर मॅक्कलम-आगरकरची टक्कर, सेहवाग-आफ्रिदीही दिसणार

भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर, श्रीलंकेचा माजी बॅट्समन तिलकरत्ने दिलशान, न्यूझीलंडचा नॅथन मॅक्कलम सेंट मोरिट्ज आईस क्रिकेट २०१८मध्ये सहभागी होणार आहेत.

बर्फाळ विकेटवर मॅक्कलम-आगरकरची टक्कर, सेहवाग-आफ्रिदीही दिसणार

मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर, श्रीलंकेचा माजी बॅट्समन तिलकरत्ने दिलशान, न्यूझीलंडचा नॅथन मॅक्कलम सेंट मोरिट्ज आईस क्रिकेट २०१८मध्ये सहभागी होणार आहेत. ८ आणि ९ फेब्रुवारीला स्वित्झर्लंडमधील पर्यटन स्थळ सेंट मोरिट्जमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

शाहीद आफ्रिदी, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, महेला जयवर्धने, लसीथ मलिंगा, शोएब अख्तर, मायकल हसी, ग्रॅम स्मिथ, जॅक कॅलीस, डॅनिअल व्हिटोरी, मॅक्कलम, ग्रांट एलियट, माँटी पनेसार, ओवैस शहा हे खेळाडू आधीच या स्पर्धेशी जोडले गेले आहेत. 

 

Read More