Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS SA : विराटने ऐकले नाही धोनीचे, रोहितचे ऐकून झाला पश्चाताप

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. पण या मॅचमध्ये खूप विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाममध्ये कर्णधार विराट कोहलीने काही असे केले जे क्रिकेट फॅन्सला बिल्कुल आवडले नाही. 

 IND VS SA : विराटने ऐकले नाही धोनीचे, रोहितचे ऐकून झाला पश्चाताप

डरबन :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. पण या मॅचमध्ये खूप विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाममध्ये कर्णधार विराट कोहलीने काही असे केले जे क्रिकेट फॅन्सला बिल्कुल आवडले नाही. 

मॅचमध्ये असा एक क्षण आला जेव्हा विराट कोहलीने विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीचे ऐकले नाही त्यामुळे त्याला पश्चातापाची वेळ आली. एका चेंडूवर डीआरएस घेताना विराटने धोनी आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा सल्ला घेतला नाही. रोहित शर्माने सांगितल्यानंतर लगेच विराट कोहलीने डीआरएसचा कॉल घेतला. त्यानंतर जे काही झाले ते भारतीय फॅन्सला आवडले नाही. 

कधी झाला हा प्रकार 

दक्षिण आफ्रिकेच्या डावात ३६ व्या षटकात भारताकडून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या ३ च्या चेंडूला अंपायरने वाईड घोषीत केले. स्ट्राइकवर क्रिस मॉरिस होता. रोहितला वाटले की चेंडू मॉरिसच्या ग्लव्सला लागला आहे.  विराटलाही तसेच वाटले. 

 

 

गोलंदाज आणि विकेटकीपर धोनीला न विचारता विराटने डीआरएसने घेतला. रोहितने विराटला आश्वस्त केले की मॉरिसच्या ग्लव्सला चेंडू लागला आहे. तिसऱ्या अंपायरने रिप्ले पाहिला तर चेंडू ग्लव्सच्या आसपासही नव्हता. त्यामुळे भारताचा हा रिव्ह्यू वाया गेला. 

Read More