ENG vs IND: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव झाला. दरम्यान स्टुअर्ट ब्रॉड आणि जोस बटलर यांना लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या मैदानावरील कृत्यांचा उलट परिणाम झाला, ज्यामुळे भारताचा पराभव झाला असं मत मांडलं आहे. पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी 193 धावांची गरज होती. चौथ्या दिवशी भारत दयनीय अवस्थेत असतानाही वॉशिंग्टन सुंदरने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत, वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या दिवशी लंचच्या आधी आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता.
"नक्कीच भारत जिंकत आहे. बहुतेक लंचच्या आधी आम्ही जिंकू आणि सकारात्मकपणे बाहेर पडू. ड्रेसिंग रुममध्ये आमच्याकडे उत्तम फलंदाज आहेत," असं वॉशिंग्टन सुंदरने म्हटलं आहे. पण सुंदरचा आत्मविश्वास त्यांनाच नडला. सुंदरच्या विधानानंतर आक्रमक झालेल्या इंग्लंडने जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आपली तीव्रता वाढवली. सुंदरचा धाडसी अंदाज त्याला नडला जेव्हा तो पाचव्या दिवशी शून्यावर बाद झाला, आर्चरने गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
सुंदरच्या विधानावर बटलर म्हणाला, त्याने केलेलं ते विधान इंग्लंडसाठी प्रेरणादायी ठरलं. 'फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट' पॉडकास्टवर त्याने सांगितलं की, "वॉशिंग्टन फलंदाजीसाठी आला आणि ब्रेंडन मॅक्युलम बाल्कनीतून सर्वांना हात वर करायला सांगत असतानाची एक छोटीशी क्लिप आहे. हात तो जो आरडाओरड करत होता".
बटलरने म्हटलं की, सुंदरने अनावधानाने आपल्या आत्मविश्वासू विधानाने स्वत:साठी एक टार्गेट उभं केलं होतं. "तू स्वतःला सेट केलंस, नाही का? ते भयानक आहे. पण आता सर्वांना माहित आहे की मी काल रात्री मीडियामध्ये काय बोललो आणि सगळे माझ्या मागे लागले आहेत. अगदी मॅक्युलम पुढे झुकून म्हणाला, चला याला बाद करुया", असं बटलरने सांगितलं.
इंग्लंड संघाला प्रेरणा मिळण्यासाठी सुंदरचं हे विधानच भरपूर होतं. "मला वाटतं की, बहुतेक त्याचे शब्द चुकले असावेत. पण त्याने चांगलाच आत्मविश्वास दिला. हो आम्ही जिंकू हे त्याचं विधान ड्रेसिंग रुममध्ये कोणीतरी ऐकलं असावं. हे असं झालं होतं की, कोणीही इंग्लंडला सकाळी काही सांगण्याऐवजी ती मुलाखत दाखवली असती तरी सर्वजण प्रेरित झाले असते," असं तो म्हणाले.
दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडने स्लिपम कशाप्रकारे नितीश कुमार रेड्डी इंग्लंड संघाचा मुख्य लक्ष ठरला हे सांगितलं. सामन्याच्या सुरुवातीला रेड्डीने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांना शब्दांच्या माध्यमातून कशाप्रकारे टार्गेट केलं होतं हे सांगितलं. ब्रॉडने सांगितलं की, आर्चरचा आक्रमक स्पेल हा संघाने जशास तसं दिलेलं उत्तर होतं.
"जोफ्राने ताशी 92 च्या वेगाने आपला जलद स्पेल टाकला. मी तुला इतकं आक्रमक कधीच पाहिलेलं नाही असं मी त्याला म्हणालो. खरं तर ही संघाची रणनीती होती. त्यांनी झॅकला टार्गेट केलं होतं. आम्ही जशास तसं उत्तर दिलं," असं ब्रॉडने सांगितलं.
पाचव्या दिवशी आर्चरने रेड्डीचं पहिल्याच चेंडूवर जोरदार बाउन्सर मारून स्वागत केलं तेव्हा ही योजना स्पष्ट झाली. त्यानंतर संपूर्ण इंग्लंड संघाचा हेतू स्पष्ट होत होता. "बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूटी रेड्डीच्या मागे लागले होते, कारण क्रॉली आणि डकेट खेळताना रेड्डी पार बोलत होता," असं ब्रॉडने सांगितलं.