Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'फक्त एकच मंत्र होता...' सहखेळाडूने सांगितलं धोनीचं सिक्रेट, आपल्या संघाला असं बनवतो चॅम्पियन

IPL 2025 : चेन्नई सुपरकिंग्सचा माजी वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने त्याच्या कर्णधार म्हणून धोनीच्या (MS Dhoni) यशस्वी होण्याच सिक्रेट सांगितलं आहे. 

'फक्त एकच मंत्र होता...' सहखेळाडूने सांगितलं धोनीचं सिक्रेट, आपल्या संघाला असं बनवतो चॅम्पियन

Sudeep Tyagi About MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी याची गणना ही जगातील सर्वात महान आणि यशस्वी कर्णधारांमध्ये होते. लोक नेहमी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात की धोनीकडे असा कोणता फॉर्मुला आहे जो धोनीला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनवतो. चेन्नई सुपरकिंग्सचा माजी वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी (Sudeep Tyagi) याने त्याच्या कर्णधार म्हणून धोनीच्या (MS Dhoni) यशस्वी होण्याच सिक्रेट सांगितलं आहे. 

स्पोर्ट्सकिडा सोबत झालेल्या मुलाखतीत सुदीप त्यागी याने सांगितले की, 'धोनी खेळाडूंना ज्या सूचना करतो, खेळाडू तेच मैदानात जाऊन करतात. एवढंच नाही तर धोनी स्वतः सुद्धा त्याला मिळालेल्या सूचना फॉलो करतो'. सुदीप त्यागीनुसार हीच गोष्ट थालाला एक यशस्वी कर्णधार बनवते असे सांगितले आहे. सुदीपने हे देखील सांगितले की, 'धोनी कोणत्याही खेळाडूशी पक्षपात करत नाही. तो सर्वांना समान मानतो आणि सर्वांशी एकसारखाच व्यवहार करतो'. त्यागी पुढे म्हणाला की, 'धोनी आम्हा खेळाडूंशी जे काही बोलतो ते आम्ही पूर्ण करतो. एवढंच नाही तर धोनी आमच्याशी कोणतीही गोष्ट बोलला तर तो स्वतः सुद्धा तसंच काम करतो. कळत की धोनी यशस्वी कर्णधार का आहे' .

37 वर्षांचा गोलंदाज सुदीपने पुढे बोलताना म्हटले की, 'मी धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्स आणि भारतीय संघात खेळलो आहे. तो कोणाही खेळाडूमध्ये कधीच भेदभाव करत नाही. तो सर्वांशी समान वागतो. सामन्याच्या परिस्थितीनुसार तो खेळाडूंचा उपयोग करतो. हेच त्याच्या यशस्वी होण्यामागचं रहस्य आहे'. त्यागीने सांगितले की, 'धोनीचा सगळ्या खेळाडूंसाठी एकच मंत्र होता की खेळताना सर्वांनी आपलं 100 टक्के द्यावं. तो म्हणाला की खेळाडू आणि संघाच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स हा सर्वात यशस्वी संघ बनला'.

हेही वाचा : IPL मध्ये धोनीच्या 'या' रेकॉर्डला रोहित - कोहली सुद्धा मोडू शकत नाहीत 

 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने 17 नोव्हेंबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यागीने भारतासाठी 4 टेस्ट खेळल्या आणि त्यात एका इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतले. तर आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये त्यागीने 6 विकेट घेतले. आयपीएल 2025 ला आता 22 मार्चला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे. चेन्नईने 2023 रोजी आयपीएलचे विजेतेपद पटकावले त्यामुळे आता सीएसकेकडे एकूण 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. यंदा पुन्हा एकदा आयपीएलचं चॅम्पियन्स होण्यासाठी सीएसके प्रयत्न करेल.  

Read More