Sunil Gavaskar's Angry Reaction: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंवर खूपच भडकले आहेत. त्याचे कारण असे की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने भारत एकाच ठिकाणी, दुबईत (Dubai) खेळत असल्याबद्दल इंग्लंडच्या वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूंना आक्षेप आहे. अशाप्रकारे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेदरम्यान भारतीय संघाचा विनाकारण फायदा झाल्याचा आरोप होत आहे. सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, जे भारताविषयी 'तक्रार' करत राहतात, त्यांनी या स्पर्धेत आपल्या देशाच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे, कारण भारतीय क्रिकेट त्यांना पगारही देत आहे.
सुनील गावसकर यांनी नासेर हुसेन, मायकेल आथर्टन इत्यादी इंग्लंडच्या विद्यमान आणि माजी क्रिकेटपटूंना चांगलंच सुनावलं आहे. गावसकर म्हणाले की, "जे क्रिकेटपंडित भारताविषयी 'तक्रार' करत असतात, त्यांनी आपल्या देशांच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे, कारण भारतीय क्रिकेट त्यांना पगारही देत आहे." स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना नासेर हुसैन आणि मायकेल अथर्टन म्हणाले की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला अधिक फायदा आहे.
हे ही वाचा: 'पुरुषांचाही विचार करा' म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या 'त्या' हट्टाने घेतला जीव
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेननेही बोलला की, पाकिस्तानमध्ये त्यांचे काही सामने खेळणाऱ्या इतर सात संघांप्रमाणे भारताला प्रवास करण्याची किंवा हॉटेल बदलण्याची गरज नाही आणि याचा फायदा घेण्यासाठी रोहित शर्मा आणि टीमवर दबाव असेल. सुनील गावस्कर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितले की, "यावर भाष्य करणेही योग्य नाही. याचा काही फायदा होऊ शकत नाही कारण खेळपट्ट्या भारताच्या नियंत्रणात नाहीत आणि खेळात प्रवास सामान्य आहे."
सुनील गावसकर म्हणाले, "खरं तर असं काहीही नाही. ते (इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू) नेहमी रडतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत कुठे उभा आहे हे त्यांना समजत नाही. गुणवत्ता, पगार, प्रतिभा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महसूल निर्मितीच्या बाबतीत जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे योगदान टीव्ही हक्क आणि मीडिया कमाईच्या माध्यमातून मोठी भूमिका बजावत आहे. त्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की त्यांचा पगार देखील भारत क्रिकेटच्या जगातामधून येतो.