Sunil Gavaskar On Suryakumar yadav: दुसऱ्या सामन्यात (ind vs aus 2nd odi) सर्वांत मोठी पराभव स्विकारावा लागल्यामुळे आता टीम इंडियावर चौफेर टीका होताना दिसत आहे. पराभव निराशाजनक असल्याचं मत व्यक्त करत कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने चूक कबुल केली आहे. तर त्यावेळी त्याने काही खेळाडूंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम दिलाय. अशातच आता टीम इंडियाचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सूर्यकुमार यादववर (Suryakumar yadav) मोठं वक्तव्य केलंय.
पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील सूर्या गोल्डन डक (Golden Duck) झाला. ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या सामन्यात अशी कामगिरी निराशाजनक आहे. त्याचबरोबर गेल्या 11 सामन्यात त्याला साधं अर्धशतक देखील साकारता आलं नाही. त्यामुळे टी-ट्वेंटी शेर वनडेमध्ये फेल ठरत असल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी सूर्याबाबतचं खरं कारण (why surya fails in ODI) सांगितलं आहे.
स्ट्रांस म्हणजेच सूर्याची क्रीजवर उभी राहण्याची शैली टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी चांगली आहे. तुमच्या पायाला लागणाऱ्या कोणत्याही चेंडूला फ्लिक करून तुम्ही षटकार मारू शकता. पण वनडेमध्ये चेंडू थोडा पुढे सरकतो. ज्यावर तुमची बॅट समोर येईल आणि तुम्ही त्यावर आऊट होऊ शकता, असं गावस्कर (Sunil Gavaskar On Suryakumar yadav) म्हणतात.
खेळताना बॉल सरळ येऊ शकत नाही. जर चेंडू थोडा आत आला तर तुम्हाला खेळताना त्रास होईल. त्याची फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर यांनी सांगितलं आहे.
What to do with Suryakumar Yadav so close to the @cricketworldcup
— ICC (@ICC) March 20, 2023
Some insight from India captain Rohit Sharma https://t.co/b0yg3K7wNI
सूर्यकुमारला वनडेतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात नाही असं कधीही वाटू नये, असं रोहित शर्मा प्रेस कॉन्फरेन्समध्ये (Rohit Sharma Press Conference) म्हणाला होता. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.