Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सुनील नरेनची चोरी पकडली! अंपायरने बॅट चेक करताच समोर आलं सत्य

IPL 2025 : पंजाबने 20 ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 112 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान केकेआर सहज पूर्ण करतील असं वाटत असताना पंजाबने त्यांना 95 धावांवर ऑल आउट केलं. 

सुनील नरेनची चोरी पकडली! अंपायरने बॅट चेक करताच समोर आलं सत्य

IPL 2025 : मंगळवारी आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये 31 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS VS KKR) यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाबने 20 ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 112 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान केकेआर सहज पूर्ण करतील असं वाटत असताना पंजाबने त्यांना 95 धावांवर ऑल आउट केलं.  मात्र या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ऑल राउंडर सुनील नरेन हा नियमांचं उल्लंघन करून सामना खेळण्यासाठी जाणार होता. 

सध्या प्रत्येक सामन्यापूर्वी फलंदाजांच्या बॅटची चेकिंग केली जात आहे. जर ऑफ फिल्ड अंपायरने बॅट चेक केली नाही तर मैदानातील अंपायर खेळाडू फलंदाजीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची बॅट तपासतात. काही दिवसांपासून अनेक खेळाडूंच्या बॅट तपासण्यात आल्या आहेत. परंतू केकेआर विरुद्ध पंजाब सामन्यात सुनील नरेन हा खुलेआमपणे आयपीएलच्या नियमांची बेईमानी करताना आढळला. 

नेमकं काय आहे व्हिडिओत: 

बीसीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्याप्रमाणे फलंदाजाची बॅट आहे की नाही हे मोजण्यासाठी अंपायर एक टूल वापरतात. या टूलमधून जर ती बॅट यशस्वीपणे पास झाली तर ती दिलेल्या मापदंडानुसार योग्य असल्याचे मानले जाते. पण केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यादरम्यान विजयाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सुनील नरेन फलंदाजीसाठी उतरणार होता. तेवढ्यात मैदानाबाहेर अंपायरने सुनील नरेनची बॅट तपासण्यासाठी मागितली. ही बॅट तपासात असताना तिचा आकार हा बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे नसल्याने ती बॅट टूलमधून पास झाली नाही. अंपायरने वेळीच बॅट तपासली नसती तर हीच बॅट घेऊन सुनील नरेन याने फलंदाजी केली असती. बॅट बीसीसीआयने ठरवलेल्या निकषांनुसार योग्य नसल्याने अंपायरने सुनीलला दुसरी बॅट घेण्यास सांगितली.  

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : टीम इंडियासोबत काम करण्याची सुवर्णसंधी! कोणत्या पोस्टसाठी Vacancy? कोण करू शकत अर्ज ?

IPL मध्ये बॅटबाबतचे सक्त नियम : 

बीसीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्यानुसार बॅटची रुंदी 4.25 इंच किंवा 10.8 सेमीपेक्षा जास्त नसावी. आयपीएलच्या नियमांनुसार, बॅटचा ब्लेड खालील परिमाणांपेक्षा जास्त नसावा त्याची रुंदी - 4.25 इंच /10.8 सेमी, खोली - 2.64 इंच /6 सेमी, एज - 1.56 इंच /4.0 सेमी. या व्यतिरिक्त, ती बॅट गेज (बॅटच्या आकाराचे मोजमाप करण्याचे साधन) मधून जाण्यास देखील सक्षम असावी.

Read More