Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?

आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय.

'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?

मुंबई :  भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिकच्या (Umran Malik) गोलंदाजीची खुप चर्चा रंगलीय. त्याच्या या गोलंदाजीची तूलना आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी (Shoaib Akhtar) होतेय.शोएबचा वेगवान चेंडू टाकण्याचा 20 वर्ष जुना विक्रम उमरान मोडीत काढू शकतो अशीही चर्चा आहे.या सर्व प्रकारात आता शोएब अख्तरने यावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. 

आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय. निव्वळ फास्ट चेंडूचं नाही तर तितक्याच वेगाने तो विकेट्सही काढतोय. त्यामुळे उमरानच्य़ा (Umran Malik) गोलंदाजीवर अनेक आजी-माजी खेळाडू प्रतिक्रिया देतायत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम हा शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएबचा हा विक्रम  20 वर्ष जुना अजून अद्याप कोणी मोडू शकले नाहीय.मात्र हा विक्रम मोडण्यात आता उमरानचे नाव चर्चेत आहे. 

शोएब अख्तर काय म्हणाला ? 

नुकतचं कोणीतरी माझे अभिनंदन केले की तुमच्या रेकॉर्डला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणीही ते मोडू शकले नाही. यावर मी म्हणालो कि कोणीतरी गोलंदाज असावा.  हा विक्रम मोडलाच पाहिजे. त्याने (उमरान) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. मात्र विक्रम मोडताना हाडे मोडू नका. तो तंदुरुस्त राहो,  हीच माझी प्रार्थना आहे.मला त्याची खूप मोठी कारकीर्द बघायची आहे, असे शोएब म्हणालाय.  

अख्तर (Shoaib Akhtar) पुढे म्हणाला, उमरान सातत्याने 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. हे पाहून आनंद झाला. मला या नवीन मुलाची गोलंदाजी पाहायची होती. केव्हापासून फिरकीपटू बघून कंटाळा आला आहे? तो १०० एमपीएच वेगाने गोलंदाजी करतो याचा मला आनंद होईल. फक्त त्याला दुखापत होऊ देऊ नका म्हणजे त्याचे करियर पणाला लागेल.

Read More