Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'ही अनिच्छा आहे का?', लाईव्ह शोमध्ये सुरेश रैना आणि आकाश चोप्रा धोनीवरुन भिडले; 'तुमचा इतका मोठा खेळाडू, अन् त्याला...'

आयपीएल 2025 महेंद्रसिंग धोनीसाठी सर्वात वाईट हंगाम ठरला आहे. धोनी आपल्या नावाला साजेशी एकही खेळी करु शकला नाही.   

'ही अनिच्छा आहे का?', लाईव्ह शोमध्ये सुरेश रैना आणि आकाश चोप्रा धोनीवरुन भिडले; 'तुमचा इतका मोठा खेळाडू, अन् त्याला...'

आयपीएल 2025 मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास संपुष्टात आला आहे. पाच वेळा विजेतेपद मिळवणारा आणि एकेकाळी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या संघाने गेल्या काही वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. 2021 पासून त्यांनी दोनदा विजेतेपद जिंकलं आहे. मात्र काही वेळा त्यां यश मिळू शकलं नाही. अनेक वेळा तर त्यांना प्लेऑफ गाठतानाही संघर्ष करावा लागला आहे. आयपीएलमध्ये 10 संघ खेळायला लागल्यापासून चेन्नई संघ कधीही तळाशी राहिला नाही. मात्र या हंगामात त्यांच्यावर ही स्थिती ओढावली आहे. 

ऋतुराज गायकवाड जखमी झाल्याने महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. पण त्यानंतरही चेन्नई संघाचं नशीब चमकू शखलं नाही. धोनीचं वय, जखमी गुडघा याचा त्याच्या खेळावरही परिणाम झाला. गेल्या वर्षी धोनीने 53 च्या सरासरीने तुफान फलंदाजी केली होती. यावर्षी त्याच्या धावसंख्येत सुधारणा दिसत असली तरी, तरी स्ट्राईक-रेटमध्ये घट झाली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सवर शानदार विजय मिळवून चेन्नई सुपरकिंग्ज हंगामातून बाहेर पडला आहे. पण तरीही त्याचा फारसा अभिमान बाळगता आला नाही. 

सामन्यानंतर सुरेश रैना आणि आकाश चोप्रा यांच्यात जोरदार वाद झाला. याचं कारण दोघांचं मत धोनीबद्दल वेगळं होतं. धोनीचा आणखी एक जवळचा मित्र आरपी सिंग देखील शेवटी एक बाजू निवडल्याशिवाय राहू शकला नाही.

दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं? 

आकाश चोप्रा: जर एमएस धोनी अनकॅप्ड भारतीय नसता, तर तो यावर्षी सीएसके संघाचा भाग असता का?

सुरेश रैना: नक्कीच, तो १८ वर्षांपासून संघासोबत आहे. आताही, तो सर्वाधिक षटकार मारतो.

आकाश चोप्रा: मुद्दा असा आहे की, तो 7, 8 किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजी का करत आहे? तुमचा संघ चांगली फलंदाजी करत नाही, समस्या टॉप ऑर्डरकडून येत आहे. इतक्या मोठ्या खेळाडूने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी का? ही अनिच्छा का? तो अगदी तंदुरुस्त आहे की नाही?

सुरेश रैना: त्याला वाटतें की तो शेवटच्या चार षटकांमध्ये अधिक आरामदायक आहे. तो तंदुरुस्त आहे, 44 वर्षांच्या वयात विकेटकीपिंग करतो. त्याने एक मुलाखत दिली आणि म्हटलं की, विश्वचषक (टी-20) साठी एक संघ बनवला जात आहे, म्हणून तो शिवम दुबेसारख्या इतरांना संधी देऊ इच्छितो.

आरपी सिंग: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर, तो वेळ घेण्यास बांधील आहे. प्रत्येक खेळाडू करतो. तो 20 वर्षांपासून स्वतःला सांभाळत आहे. रैनाचे गुडघ्याचे ऑपरेशनही झाले होते. काही काळ त्याने स्वतःला सांभाळले आणि अखेर तो बरा झाला.

गेल्या काही वर्षांमध्ये धोनीच्या निवृत्तीवर खेळाडू जाहीरपणे भाष्य करत नव्हते. मात्र त्या तुलनेत सध्या खेळाडू जाहीरपणे भाष्य करत आहेत. संजय बांगर आणि अॅडम गिलख्रिस्ट सारख्या माजी खेळाडूंनी उघडपणे धोनीने निवृत्ती घ्यावी असं सांगितलं आहे. धोनीने मात्र अद्याप आपण निवृत्तीच्या तयारीत नसल्याचं सांगितलं आहे. 

Read More