Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ईशान आणि SuryaKumar Yadav मध्ये इतकं काय बिनसलं की, मारण्याचा भाषेवर आला खेळाडू!

सूर्यकुमारच्या या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आणि भुवनेश्वर कुमार दिसत आहेत.

ईशान आणि SuryaKumar Yadav मध्ये इतकं काय बिनसलं की, मारण्याचा भाषेवर आला खेळाडू!

मुंबई : इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या वनडे सिरीजपूर्वी टीमचे स्टार्स, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शिखर धवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव वेलकम या बॉलिवूड चित्रपटाचा डायलॉग बोलताना दिसतोय. सूर्यकुमारने या चित्रपटातील उदय भाईची भूमिकेची नक्कल केलीये.

स्वतः सूर्यकुमारने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. सूर्यकुमारच्या या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आणि भुवनेश्वर कुमार दिसत आहेत. सूर्यकुमारचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. जवळपास तीन लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरून सूर्यकुमारच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलीये. त्याचबरोबर काही यूजर्स सूर्यकुमारच्या एक्टिंगचं कौतुक करतायत.

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे दोघंही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून खेळतात. मुंबई इंडियन्समध्ये त्याची सर्वात चांगली मैत्री इशान किशनसोबत असल्याचेही सूर्यकुमारने अनेकदा सांगितलंय. ते दोघेही टीम इंडियामध्ये एकत्र खेळत असून या व्हिडीओमध्ये दोघांची जुगलबंदी पहायला मिळतेय. 

टीम इंडियाला सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची सिरीज खेळणार आहे. 22 जुलैपासून वनडे सिरीज सुरू होतेय. या सिरीजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Read More