Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सुषमा स्वराज यांनी पासपोर्टच्या बदल्यात मेडल मागितले अन....

सुषमा स्वराज या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोकांच्या मदतीला उपस्थित असतात या गोष्टीचा प्रत्यय अनेकदा आला आहे. 

सुषमा स्वराज यांनी पासपोर्टच्या बदल्यात मेडल मागितले अन....

मुंबई : सुषमा स्वराज या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोकांच्या मदतीला उपस्थित असतात या गोष्टीचा प्रत्यय अनेकदा आला आहे. 

काही दिवसांपूर्वी पंधरा वर्षीय मुलीला युक्रेनमध्ये सहभागी बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी पासपोर्टची गरज होती. स्थानिक पासपोर्ट ऑफिसमध्ये अर्ज दाखल करूनही तो वेळेत मिळत नव्हता. त्यावेळेस तिने ट्विटरवर त्यासंबंधी एक फोटो ट्विट केला आहे.  

पासपोर्ट्च्या बद्दल्यात मेडल 

झलर या मुलीच्या मदतीला सुषमा स्वराज धावून आल्या. त्यानंतर मी तुला पासपोर्ट देते पण त्या बदल्यात मेडल आणशील ? असे गंमतीशीर डील झाले होते. याप्रमाणेच झलकने ज्युनियर चॅम्पनशिपमध्ये रजत पदक मिळाले आहे. 

झलकचा दमदार खेळ 

15 वर्षीय झलकने 54 किलोग्राम वजनी गटात रजत पदक कमावले आहे.  झलक सोबतच अरूंधती चौधरी, मितिका गुनेले, राज साहिबा यांनी पदकांची कमाई केली आहे. 

 

सुषमा स्वराज यांनीदेखील झलकचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक आणि अभिनंदन केले आहे. 

Read More