Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

India vs Australia 4th Test Day 5 Live Updates : पावसामुळे सामना अनिर्णित, भारताच्या खात्यात ऐतिहासिक विजय

जाणून घ्या सामन्याच्या लाईव्ह अपडेट्स 

India vs Australia 4th Test Day 5  Live Updates : पावसामुळे सामना अनिर्णित, भारताच्या खात्यात ऐतिहासिक विजय

मुंबई : India vs Australia 4th Test Day 5  Live Updates

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असणाऱ्या कसोटी सामन्यांमधील चौथ्या आणि निर्णायक सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे अद्यापही सुरु झालेला नाही. बॉर्डरॉ- गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने सुरु असणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताडे २-१ अशी आघाडी आहे. हीच आघाडी ऐतिहासिक विजयात बदलण्याकडे भारतीय क्रिकेट संघाचं लक्ष्य आहे. याच लक्ष्यासह चौथ्या कसोटीच्या चौख्या दिवशीही भारतीय संघ मैदानात उतरला पण, पाऊस आणि अंधुक प्रकाश यांमुळे खेळात व्यत्यय आला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने बिनबाद सहा धावा केल्या होत्या. 

सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ७ बाद ६२२ अशी धावसंख्या करत हा डाव घोषित केला होता. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवरच आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑन ओढावलं होतं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिस (७९) ने सर्वाधिक स्कोर केला. शिवाय मार्न्स लाबुशानने ३८ आणि पीटर हॅंड्सकॉम्बने ३७ धावांची खेळी केली होती. पण, कुलदीप यादवच्या फिरकीपुढे कांगारूंनी मात्र हात टेकले. 

*चौथ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट आल्यामुळे अखेर हा सामना अनिर्णित ठरवण्यात आला आहे. 

*पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब. 

Read More