दुबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. हा सामना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सामन्याआधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम स्वत:च्या टीममधील खेळाडूंना डिवचताना दिसला. त्यानंतर बाबार आझमने फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करूनही त्याला क्रिकेट प्रेमींच्या संतापाचा सामना करावा लागला. बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.
ओमानमध्ये क्वालिफिकेशन राऊंड सुरू आहेत. 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दोन्ही संघ मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. आता फक्त त्या वेळेची प्रतिक्षा आहे. एका वॉर्मअप सामन्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर सध्य़ा चर्चेत आहे. हा व्हिडीओ ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मात्र या व्हिडीओनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आहे.
सोमवारी पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाने वेस्टइंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यात बाबर आझमचे जबरदस्त फलंदाजी केली. 41 चेंडूमध्ये 6 चौकार आणि एक षटकार ठोकून त्याने 50 धावा केल्या. जसा बाबर आझमची बॅटिंग चालली त्याच वेगाने त्याने टोमणेही मारले. ज्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली.
शाहीन शाह अफरीदीच्या दुसऱ्या चेंडूवर उपकर्णधार शादाब खान याने डायरेक्ट थ्रो केला. मात्र वेस्टइंडिजच्या फलंदाजाला रनआऊट करण्यात यश आलं नाही. त्यावेळी बाबर आझमने शादाब खानला टोमणा मारला. म्हतारा झालास तू म्हतारा असं जोरात बाबर आझम ओरडताना दिसला आहे. तरुण असूनही तुझ्याकडून रनआऊट झालं नाही. असा टोमणा बाबर आझमने मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Babar Jani To Shadab:-
— || A S A D || (@Asad_Labana) October 19, 2021
'Bhuda hogya, Bhuda hogya,
"Pean dy sri Ay Jawani Ich Run Out Ni Honda" #KingBabarpic.twitter.com/eGNApAWtjg