Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 World Cup : टीम इंडियामध्ये 2 गट, एक विराटसोबत तर दुसरा विरोधात, शोएब अख्तरचा दावा

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये ( T 20 World Cup) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.   

T20 World Cup : टीम इंडियामध्ये 2 गट, एक विराटसोबत तर दुसरा विरोधात, शोएब अख्तरचा दावा

मुंबई : टीम इंडियाला (Team India) सुरुवातीपासून टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) प्रबळ दावेदार समजलं जात होतं. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan) 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. तर त्यानंतर न्यूझीलंडने (New Zealand) 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या अशा निराशाजनक कामगिरीमुळे हैराणी व्यक्त करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही (Shoaib Akhtar) हैराण झाला. टीम इंडियामध्ये 2 गट असल्याचं मला वाटतंय, असंही अख्तर म्हणाला. (T 20 World Cup team india divided in 2 group says former paksitani faster bowler shoaib akhtar

अख्तर नेमकं काय म्हणाला? 

"मला असं का वाटतंय की टीम इंडियात 2 गट आहेत. ज्यामधील एक गट हा कोहलीसोबत आहेत, तर दुसरा त्याच्या विरोधात आहे. हे स्पष्ट दिसून येतेय. टीम विभागलेली वाटतेय. मला माहिती नाही असं का होतंय. विराटचा हा कर्णधार म्हणून शेवटचा वर्ल्ड कप असल्याने असं असू शकतं. असं असू शकतं की त्याने चुकीचा निर्णय घेतला, जो योग्य असेल. पण विराट एक दिग्गज क्रिकेटर आहे आणि त्याचा सन्मान करायला हवा", असं मत अख्तरने व्यक्त केला. अख्तर त्याच्या यूट्युब चॅनेलवर बोलत होता.

टीम इंडियावर नाराजी

टीम इंडियाच्या कामगिरीवरुन अख्तरने नाराजी व्यक्त केली. "'टीका करणं आवश्यक आहे आहे कारण टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध फार वाईट खेळली आहे. त्यांचा दृष्टीकोन चुकीचा होता. टॉस हरल्यानंतर प्रत्येकाच्या माना झुकलेल्या होत्या. नेमकं का होतंय याची कल्पनाही त्यांना नव्हती. टीम इंडिया तेव्हा फक्त टॉस हरली होती मॅच नाही. ते फक्त तिथे खेळत होते. टीम इंडियाकडे कोणताही गेमप्लॅन नव्हता", असंही अख्तरने नमूद केलं.

Read More