Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधील फोटो Viral... अचानक काय झालं? चाहत्यांना दिली महत्त्वाची अपडेट

Suryakumar Yadav Surgery: भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्याने माहिती दिली की त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे.    

सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधील फोटो Viral... अचानक काय झालं? चाहत्यांना दिली महत्त्वाची अपडेट

Suryakumar Yadav Hernia Surgery: टी20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटपासून लांब  आहे, आणि त्याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. सूर्यकुमार यादवची स्पोर्ट्स हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या रीकव्हरीच्या प्रक्रियेत आहे. जर्मनीमध्ये ही सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. र्याने सोशल मीडियावर ऑपरेशननंतरचा फोटो शेअर केला आणि याबद्दल अपडेट दिली.  34 वर्षीय सूर्यकुमार यादवकडे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली आहे. 

रुग्णालयातून शेअर केला फोटो 

सूर्यकुमार यादवनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. रुग्णालयाच्या बेडवर झोपेला हा फोटो आहे. त्याने हा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'लाइफ अपडेट – पोटाच्या उजव्या खालच्या भागात स्पोर्ट्स हर्निया झाल्यानं सर्जरी झाली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची आतुरता आहे."

हे ही वाचा: 'चुकीच्या लोकांशी...', पृथ्वी शॉने सांगितलं अपयशामागील खरं कारण; खुलासा करत म्हणाला 'मी आयुष्यात खूप...'

 

बांगलादेश दौऱ्याला सूर्या गैरहजर राहणार?

सर्जरीनंतर सूर्या आता काही काळ मैदानाबाहेर राहणार, असं स्पष्ट होतंय. ऑगस्टमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला तो जाऊ शकणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण स्पोर्ट्स हर्निया सर्जरीनंतर 6 ते 12 आठवड्यांचा रीकव्हरी कालावधी लागतो.

 हे ही वाचा: 3442 कोटी रुपयांच्या लीगच्या विरोधात BCCI राहिली उभी! सौदी अरेबियाच्या विरुद्ध 'या' देशाशी मिळवला हात

टी20 वर्ल्ड कपमध्ये करणार नेतृत्व

सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टेस्ट मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाईल. तिथे टी20 मालिकेचे सामने 26 ते 31 ऑगस्टदरम्यान होतील. मात्र सूर्या त्या मालिकेसाठी उपलब्ध नसू शकतो.  टी20 फॉर्मेटमधील पुढची मोठं स्पर्धा म्हणजे टी20 वर्ल्ड कप 2026, जो भारत आणि श्रीलंकेत फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

 

सूर्यकुमार यादवचं आंतरराष्ट्रीय करिअर

  • 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यानं आजवर 1 टेस्ट, 37 वनडे आणि 83 टी20 सामने खेळले आहेत.
  • वनडेमध्ये त्याने 773 धावा केल्या असून, त्यात 4 अर्धशतकं आहेत.
  • टी20मध्ये सूर्यानं 2598 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतकं आणि 21 अर्धशतकं समाविष्ट आहेत.

हे ही वाचा: Sourav Ganguly Biopic: ठरलं तर मग! 'हा' अभिनेता सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये साकारणार मुख्य भूमिका

IPL 2025 मध्येही केली धमाकेदार कामगिरी 

ऑपरेशनपूर्वी सूर्या IPL 2025 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने 16 इनिंगमध्ये 717 धावा केल्या होत्या, ज्यात 5 अर्धशतकं होती. 2018 पासून सूर्या मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यानं IPL मध्ये पदार्पण 2012 मध्ये MI कडून केलं होतं, पण नंतर चार वर्षे तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडूनही खेळला होता.

Read More