Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबई प्रीमियर लीग आजपासून सुरूवात

मुंबई प्रीमियर लीगचा भव्य असा उदघाटन सोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

मुंबई प्रीमियर लीग आजपासून सुरूवात

मुंबई : मुंबई प्रीमियर लीगचा भव्य असा उदघाटन सोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई प्रीमियर लीगचा धमाका अखेर आजपासून सुरुवात होत आहे. मुंबई क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारची लीग प्रथमच होत असून या लीगमध्ये सहा संघ ऐकमेकांशी भिडणार आहेत

काय म्हणाला मास्टर ब्लास्टर 

.या लीगद्वारे मुंबईतील गुणवान क्रिकेटेर्सना आपल्यातील गुणवत्ता दाखवायची संधी मिळेल. जी आमच्यावेळी नव्हती. तुमची अधुरी स्वप्न या लीगद्वारे पूर्ण होतील. या सोनेरी संधीचा फायदा घ्या या लीगमुळे खेळाडूंना ओळख मिळेल आणि त्यांच्या गुणवत्तेची या लीगमध्ये दखल घेतली जाईल असं सचिननं सांगितलं.  तर लीग कमिशनर सुनिल गावसकर यांनी या लीगमध्ये खेळाडूंनी केलेल्या कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.

Read More